शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मेल्ट्रोनमध्ये उच्च दाबाच्या ऑक्सिजनअभावी रुग्णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:06 IST

औरंगाबाद : महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी सकाळी एका रुग्णाचा उच्च दाबाच्या ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर ...

औरंगाबाद : महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी सकाळी एका रुग्णाचा उच्च दाबाच्या ऑक्सिजनअभावी तडफडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला. मात्र रुग्णालय प्रशासनाकडून लपवाछपवी केली जात असून, घाटी रुग्णालयात नेताना रुग्णाचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

महापालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटरमध्ये ३५० रुग्णांवर उपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या ३०० पेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. गंभीर रुग्णांसाठी येथे ऑक्सिजनची व्‍यवस्था आहे. पण गंभीर रुग्णांना घाटी रुग्णालयात रेफर केले जाते. मंगळवारी सकाळी एका रुग्णाची प्रकृती गंभीर बनली. ऑक्सिजनची मात्रा वाढविण्याची गरज होती. परंतु मेल्ट्रॉनमध्ये ऑक्सिजन त्याप्रमाणात देण्याची यंत्रणा उपलब्ध नसल्याने रुग्णाचा काही मिनिटांतच मृत्यू झाल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, एका रुग्णाची काल प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्याला घाटी रुग्णालयात पाठविले जात होते. रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. मेल्ट्रॉनच्या प्रमुख डॉ. वैशाली मुदगलकर यांनीही, मेल्ट्रॉनमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा केला. मागील काही दिवसांमध्ये मेल्ट्रॅान हॉस्पिटलमधून घाटीत किती रुग्णांना पाठविण्यात आले, त्यातील किती रुग्ण मरण पावले याचा तपशील मनपाच्या आरोग्य विभागाने दिला नाही.

----------

रुग्णालयाच्या बाहेर रुग्ण मेला तरी चालेल...

मेल्ट्रॉनमध्ये रुग्ण गंभीर बनल्यानंतर त्यास घाटी किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्याचे प्रकार वाढले आहेत. इतर ठिकाणी हलविताना अनेक रुग्ण घाबरत आहेत. मात्र मेल्ट्रॉनमध्ये एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्यास खपवून घेतले जाणार नाही. रुग्णालयाच्या बाहेर रुग्ण मेला तरी चालेल, असे फर्मान येथील डॉक्टरांना प्रशासनाने दिल्याचे सूत्रांनी सांगितले.