ऑनलाइन लोकमत
अजिंठा, दि. 4 - भोकरदनकडून अजिंठ्याकडे वाळू घेऊन येणारा ट्रक जळगाव-औरंगाबाद रस्त्यावर पानस फाट्याजवळ उलटल्याने क्लीनरचा जागीच मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
अहेमदशहा बशीर शहा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी जखमीला उपचारांसाठी औरंगाबाद येथे हलवले आहे. भोकरदनकडून अजिंठा पोलिसांच्या हद्दीत भरधाव वेगाने येणारा वाळूचा ट्रक दुस-या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने उलटल्याची माहिती मिळाली आहे.
सिल्लोड तालुक्यात भोकरदनची वाळू
सिल्लोड तालुक्यात अवैद्य वाळू तस्करी वाढली आहे. भोकरदन ची वाळू सिल्लोड तालुक्यासहीत अजिंठा परिसरात येत आहे. सिल्लोड तालुक्यातील वाळू पट्टे बंद असल्याने भोकरदनची वाळू परिसरात प्रशासनाच्या आशीर्वादाने दिवसा येत असल्याचा आरोप होत आहे.