शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अन्न पाण्याविना बिबट्याचा मृत्यू, सिरसाळ्याच्या डोंगरात आढळले मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 21:10 IST

अन्न पाण्याच्या शोधार्थ डोंगरात भटकंती करणाऱ्या दीड वर्षाच्या  बिबट्याचा  तडफडून मृत्यू झाला

सिल्लोड : अन्न पाण्याच्या शोधार्थ डोंगरात भटकंती करणाऱ्या दीड वर्षाच्या बिबट्याचा तडफडून मृत्यू झाला.. ही घटना सिल्लोड तालुक्यातील सिरसाळ्याच्या डोंगरात घडली तब्बल पांच दिवस बिबट्याचे प्रेत डोंगरात पडून होते.. एका गुराख्याने वनविभागास माहिती दिल्याने गुरुवारी संध्याकाळी ही घटना समोर आली. रात्री डोंगरात वनकर्मचाऱ्यानी पहारा देऊन  शुक्रवारी सकाळी त्याचे जागेवर शवविच्छेदन करून अंतिम संस्कार केले. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शिरसाळा गावापासून 2 किलिमिटर अंतरावर असलेल्या  खोल दरीत या बिबट्याचे प्रेत एका गुरख्याला गुरुवारी दिसले त्या नंतर त्याने सोयगाव वन विभागास माहिती दिली. पण तेथील काही कर्मचारी जळगाव,तर काही औरंगाबाद येथे गेले असल्याने याची माहिती गुरुवारी लपविण्यात आली.  सिल्लोड चे वनपरिक्षेत्र अधिकारी एस आर दहिवाल, अजिंठ्याचे मागधरे, सोयगावचे शिवाजी काळे, वनपाल, वनरक्षक यांनी शुक्रवारी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्या नंतर शवविच्छेदन करून बिबट्याचे अंतिम संस्कार करण्यात आले.

शिरसाळा हे गाव सिल्लोड तालुक्यात येत असले तरी याला वनविभाग सोयगाव येते... सर्व गैर सोईनी नटलेल्ल्या या सोयगावात अधिकारी कर्मचारी औरंगाबाद,जळगाव  येथून अपडाऊन करतात... जंगलात वन्य प्राण्यांना पिण्यासाठी पाणी नाही..सर्व पाणवठे कोरडे पडले आहे.. कागदावर त्या पांनवठ्यात पाणी सोडल्या जाते... डोंगरात वृक्ष तोड वाढली आहे. मानवी हस्तक्षेप वाढला आहे.6 दिवसांपूर्वी बिबट्या डोंगरात मरून पडलेला वन कर्मचाऱ्याना दिसला नाही.. याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. यामुळे वनविभागाचे  जंगलात किती लक्ष आहे हे दिसून येते.कर्मचाऱ्यानी डोंगरात पेट्रोलिंग केली असती तर सहा दिवसांपूर्वी ही घटना उघड झाली असती.अन्न पाण्यामुळेच मृत्यू....ही तर भूक बळीच आहे... सहा दिवसात बिबट्याचे प्रेत कुजले होते.. त्याची चामडी गळून पडत होती. त्याच्या पोटात अन्ना चा एक कण नव्हता.. पाणी नव्हते.. यामुळे त्याचा मृत्यू  अन्न पाण्यामुळेच झाला आहे.-डॉ. धनंजय महाजन पशुवैद्यकीय अधिकारी घाटनांद्रा.

मेल्यानंतर ही हेळसांडजिवंत पणी त्या बिबट्याला डोंगरात अन्न पाणी मिळाळे नाही... त्यासाठी त्याला भटकंती करावी लागली... मेल्यावर सुद्धा 6 दिवस त्याकडे कुणी पाहिले नाही... त्याचे प्रेत अक्षरशा कुजले होते.. यामुळे निसर्ग प्रेमी संताप व्यक्त करीत आहे. दोषी कर्मचाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे.