नवीन नांदेड: ड्रेनेज लाईनच्या खड्डयामध्ये सेफ्टी प्लेटस लावत असताना अंगावर माती पडल्याने एका २७ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. ही घटना २० आॅगस्ट रोजी रात्री नऊ ते साडेनऊ दरम्यान गाडेगाव रस्त्याशेजारील फातेमा हायस्कूलजवळ घडली. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, चौफाळा भागातील महंतवाडी येथील दुर्गादास गौतम काळे हे ड्रेनेज लाईनच्या खड्डयात सेफ्टी प्लेटस लावत होते. त्याचवेळी, अंगावर माती पडल्याने दुर्गादास काळे यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिस ठाणे अंमलदार तथा सहायक पोलिस उपनिरीक्षक व्ही. व्ही. मुंडे यांनी दिली. याप्रकरणी संदीप गौतम काळे यांनी दिलेल्या माहितीवरून ग्रामीण ठाण्यात २१ आॅगस्ट रोजी सकाळी आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मोहन राठोड व पो. कॉ. हनुमंत बोंबले हे अधिक तपास करीत असल्याचे पोलिस ठाणे अंमलदार हनुमंत वाघमारे यांनी सांगितले. (वार्ताहर)
माती अंगावर पडल्याने मजुराचा मृत्यू
By admin | Updated: August 23, 2014 00:48 IST