शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या विवाहितेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:23 IST

कुटुंब कल्याण शस्रक्रिया झालेल्या विवाहितेला पानवडोद प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार न मिळाल्याने तिचा गुरुवारी मृत्यू झाला. डॉक्टर व कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाला असून डॉक्टर व कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी विवाहितेच्या नातेवाईकांनी अजिंठा पोलीस ठाण्यात केली आहे. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : कुटुंब कल्याण शस्रक्रिया झालेल्या विवाहितेला पानवडोद प्राथमिक आरोग्य केंद्रात योग्य उपचार न मिळाल्याने तिचा गुरुवारी मृत्यू झाला. डॉक्टर व कर्मचा-यांच्या हलगर्जीपणामुळेच हा मृत्यू झाला असून डॉक्टर व कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी विवाहितेच्या नातेवाईकांनी अजिंठा पोलीस ठाण्यात केली आहे. गुरुवारी रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.या घटनेत मरण पावलेल्या विवाहितेचे नाव उषाबाई नामदेव गव्हाणे (रा.बोदवड, ता.सिल्लोड) असे आहे. कुटुंब कल्याण शस्रक्रियेनंतर उषाबाई यांना त्रास होऊ लागला.त्यावेळी दवाखान्यात उपचारासाठी कुणीही नव्हते. त्यामुळे तिच्या पतीने उषाबाईला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले. ही घटना आरोग्य केंद्राच्या व्यवस्थापनाला समजल्यानंतर त्यांनी उषाबाईस बोलावून उपचार सुरु केले. पुन्हा उषाबाईला बुधवारी रात्रीपासून त्रास सुरु झाला.गुरुवारी या महिलेचे टाके आरोग्य केंद्रात काढण्यात आले. त्यानंतर तिला उलट्या झाल्या. त्रास वाढल्याने तिला पुढील उपचारासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच चिचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईक संतापले.इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणीडॉक्टर व त्यांच्या कर्मचाºयांच्या हलगर्जीपणामुळेच उषाबाईचा मृत्यू झाल्याचा आरोप पती नामदेव गव्हाणे व नातेवाईकांनी केला आहे. ही घटना कळताच सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात नातलगांची गर्दी झाली. या प्रकरणी इन कॅमेरा शवविच्छेदन करावे, या मागणीवर नातेवाईक ठाम होते. सत्यता बाहेर यावी म्हणून गुरुवारी मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आला. मृत महिलेच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. गुन्हा दाखल झाला नाही म्हणून सदर महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत.यात डॉक्टर किंवा कर्मचाºयांचा दोष नाही. उषाबाईला अ‍ॅसिडीटी झाली होती. हृदयविकाराने तिचा मृत्यू झाला असावा, नातेवाईकांनी केलेले आरोप खोटे आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यावर खरे काय ते कळेल.-डॉ. एम. एम. चोपडेवैद्यकीय अधिकारी, पानवडोद