नांदेड: शहरातील हैदरबाग परिसरात एका ठिकाणी बोअर मारत असताना, पाण्याचे ट्रन्क फुटून त्याचा पत्रा लागल्याने एका मजुराचे दोन्ही पाय निकामी झाले़ उपचारादरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले़आरुमुगल रा़ प्रीती, तामिळनाडू हा २८ आॅगस्ट रोजी अहेमद मुस्तफा यांच्या घरी बोअर मारत असताना ट्रकजवळ उभा होता़ त्याचवेळी अचानक पाण्याचे ट्रन्क फुटून त्याचा उडालेला पत्रा आरुमुगल याच्या पायावर लागला़ त्यामुळे त्याचे दोन्ही पाय निकामी झाले होते़ त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ या ठिकाणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला़ याप्रकरणी इतवारा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे़ याप्रकरणी गोपाल पलनिअपन यांनी इतवारा पोलिसांना ही माहिती दिली़ (प्रतिनिधी)
बोअर मारताना मजुराचा मृत्यू
By admin | Updated: August 30, 2014 00:01 IST