शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर गाड्या बंद असल्याने रस्ते मार्गाने जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:04 IST

औरंगाबाद : औरंगाबादहून सध्या एकही पॅसेंजर रेल्वे धावत नाही. सध्या ज्या विशेष रेल्वे धावत आहेत, त्या सर्वच एक्स्प्रेस आहेत. ...

औरंगाबाद : औरंगाबादहून सध्या एकही पॅसेंजर रेल्वे धावत नाही. सध्या ज्या विशेष रेल्वे धावत आहेत, त्या सर्वच एक्स्प्रेस आहेत. त्यातही आरक्षित तिकीटधारकांनाच प्रवेश दिला जातो. पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे सर्वसामान्य, गोरगरीब रेल्वे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. पैसे वाचविण्यासाठी रस्ते मार्गाने जीवघेणा प्रवास करण्याचीही वेळ प्रवाशांवर ओढवत आहे.

कोरोनामुळे रेल्वेची वाहतूक बंद केली होती. जूनपासून सचखंड एक्स्प्रेस सुरु झाली आणि त्यानंतर विशेष रेल्वे म्हणून अन्य ७ रेल्वेही सुरू करण्यात आल्या. रोटेगाव, तारूर, परसोडा, करंजगाव, लासूर, पोटूळ, बदनापूर, जालना आदी ठिकाणांहून औरंगाबादला रोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. परंतु पॅसेंजरच नसल्याने या प्रवाशांची गैरसोय होत आहे.

सचखंड, देवगिरी, नंदीग्राम एक्स्प्रेस सुरू

औरंगाबादहून सध्या सचखंड, देवगिरी, नंदीग्राम, राज्यराणी, अजिंठा एक्स्प्रेस, नरसापूर-नगरसोल, काकीनाडा- शिर्डी एक्स्प्रेस धावत आहे. तसेच कोरोनापूर्वी पॅसेंजर असलेली औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर ही रेल्वे आता एक्स्प्रेस म्हणून धावत आहे.

नगरसोल-नांदेड पॅसेंजर बंद

नगरसोल-नांदेड पॅसेंजर, जालना-नगरसोल डेमू, निजामाबाद-पुणे, पुणे- निजामाबाद, दौंड-नांदेड, मनमाड-काचीगुडा, काचीगुडा-मनमाड या पॅसेंजर सध्या बंद आहेत. यात निजामाबाद-पुणे,दौंड-नांदेड, मनमाड-काचीगुडा जेव्हा सुरू होतील, तेव्हा एक्स्प्रेस धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय कायम राहण्याची स्थिती आहे.

रस्तेमार्गाने जीवघेणा प्रवास

रोज नोकरी, व्यवसाय, काम, शिक्षण, उपचारासाठी ये-जा करणाऱ्यांना रस्तेमार्गाने ये-जा करावी लागत आहे. पैसे वाचविण्यासाठी दुचाकीवरून ट्रिपल सिट प्रवास केला जातो. प्रवाशांची ही जीवघेणी कसरत थांबण्यासाठी पॅसेंजर सुरू होणे गरजेचे आहे.

-संतोषकुमार सोमाणी, अध्यक्ष रेल्वे प्रवासी सेना

प्रवाशांची होतेय परवड

लासूरहून औरंगाबादला पॅसेंजरने येण्यासाठी केवळ १० रुपये लागतात. परंतु, पॅसेंजरच बंद असल्याने एसटीने, दुचाकीने ये-जा करण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. त्यासाठी ६० ते ७० रुपये खर्च होतात. यातून गोरगरीब प्रवाशांची परवड होत आहे.