शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

डीबीए संघाची हायकोर्ट संघावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:59 IST

गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या राम-कमला औद्योगिक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत डीबीए संघाने हायकोर्ट संघावर ४ गडी राखून मात केली. दुसºया सामन्यात मेघा इलेक्ट्रिकल संघाने आयुर्विमा संघावर विजय मिळवला. अनंता बडदे व संतोष हातोळे हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.

औरंगाबाद : गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या राम-कमला औद्योगिक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत डीबीए संघाने हायकोर्ट संघावर ४ गडी राखून मात केली. दुसºया सामन्यात मेघा इलेक्ट्रिकल संघाने आयुर्विमा संघावर विजय मिळवला. अनंता बडदे व संतोष हातोळे हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.पहिल्या सामन्यात हायकोर्ट संघाने डीबीए अ संघाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १११ धावा केल्या. त्यांच्याकडून सुनील भोसलेने ३१ चेंडूंत ३७ व अमोल काकडेने २२ धावा केल्या. डीबीए संघाकडून दिनकर काळेने २० आणि ओमकार गुंजाळने २१ धावांत प्रत्येकी ३ गडी बाद केले. मदन कटारे याने १ व संदीप देगावकरने २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात डीबीए अ संघाने १९.५ षटकांत ६ गडी गमावून विजयी लक्ष्य गाठले. त्यांच्याकडून अनंता बडदे याने ४५ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ५१, संतोष भारती याने १७ व मोहित घाणेकरने ११ धावा केल्या. हायकोर्ट संघाकडून देवानंद नांदेडकर व प्रल्हाद बाचाटे यांनी प्रत्येकी २, तर जावेद शेखने १ गडी बाद केला.दुसºया सामन्यात मेघा इलेक्ट्रिकल्सने २० षटकांत ५ बाद १६२ धावा केल्या. त्यांच्याकडून सचिन हातोळे याने ४५ चेंडूंत ३ षटकार व ६ चौकारांसह नाबाद ५८ धावा केल्या. अशोक शिंदेने ३८ चेंडूंत ३ षटकार व ६ चौकारांसह ५६, तर नीलेश जैनने १६ धावा केल्या. आयुर्विमा संघाकडून संतोष धोटेने २ गडी बाद केले. इकबाल खान, जे. गंगवाल, महेश रेड्डी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात आयुर्विमा संघ ६ बाद १५७ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून ए. भारसाखळेने १८ चेंडूंत ६ चौकार व एका षटकारासह ३३ व एस. गणोरकरने ३२ धावांचे योगदान दिले. मेघना इलेक्ट्रिकल संघाकडून मयूर कांकरियाने २१ धावांत ३ गडी बाद केले.