शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

डीबीए अ, पीडब्ल्यूडी संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:53 IST

गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या राम-कमला औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत डीबीए अ संघाने एमआयटी संघावर तर पीडब्ल्यूडी संघाने लिप फास्टनर संघावर मात केली.

औरंगाबाद : गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या राम-कमला औद्योगिक टी-२० क्रिकेट स्पर्धेत डीबीए अ संघाने एमआयटी संघावर तर पीडब्ल्यूडी संघाने लिप फास्टनर संघावर मात केली.पहिल्या सामन्यात डीबीए अ संघाविरुद्ध एमआयटी हॉस्पिटल संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद ९९ धावा केल्या. त्यांच्याकडून सतीश डहाळेने ३१, केदार काळेने २७ धावा केल्या. डीबीए अ संघाकडून संदीप देगावकर, मोहित घाणेकर यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात डीबीए अ संघाने विजयी लक्ष्य ११.४ षटकांत १ बाद १०० धावा करीत पूर्ण केले. त्यांच्याकडून सतीश भुजंगेने ३३ चेंडूंत नाबाद ५० व चैतन्य जोशीने नाबाद २४ धावा केल्या. एमआयटीकडून आकाश लोखंडेने १ गडी बाद केला. दुसºया सामन्यात पीडब्ल्यूडीविरुद्ध लिप फास्टनरने ९ बाद ९५ धवा केल्या. त्यांच्याकडून प्रणव राजळेने २ चौकारांसह २७ आणि राहुल पाटीलने १२ धावा केल्या. पीडब्ल्यूडीकडून रवींद्र तोंडेने १५ धावांत ३ गडी बाद केले. श्याम टाकळकर व मनोज दाभाडे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. मनोज घोडके व प्रसाद सोनवणे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात पीडब्लयूडी संघाने १८.३ षटकांत ३ गडी गमावून ९८ धावा करीत विजयी लक्ष्य गाठले. पीडब्ल्यूडीकडून योगराज चव्हाणने ६ चौकारांसह ३५ व मनोज घोडकेने नाबाद २८ धावा केल्या. श्याम टाकळकरने १६ व मनोज दाभाडेने नाबाद ११ धावा केल्या. लिप फास्टनरकडून अमोल हाके याने २५ धावांत २ गडी बाद केले.