शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाच्या दिवशीही कुलगुरू गेले दौ-यावरच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 00:41 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा मतदानाच्या दिवशीही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे दौºयावरच होते. ऐन मतदानाच्या कार्यकाळातच तीन दिवसांपासून दौ-यावर असलेल्या कुलगुरूंनी दिल्लीहून मुंबईतील एका बैठकीला उपस्थित राहण्यास प्राधान्य दिल्याबद्दल विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे.

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा मतदानाच्या दिवशीही कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे दौºयावरच होते. ऐन मतदानाच्या कार्यकाळातच तीन दिवसांपासून दौ-यावर असलेल्या कुलगुरूंनी दिल्लीहून मुंबईतील एका बैठकीला उपस्थित राहण्यास प्राधान्य दिल्याबद्दल विद्यापीठ वर्तुळात आश्चर्य आणि नाराजी व्यक्त होत आहे.विद्यापीठाच्या अधिसभेसाठी पहिल्या टप्प्यात चार जिल्ह्यांतील २० केंद्रांवर शुक्रवारी मतदान झाले. या मतदानासाठी प्रत्येक बाबीवर काळजीपूर्वक नियोजन करावे लागते. मतदानाच्या आदल्या दिवशी ऐनवेळी मतपत्रिका कमी पडल्या. याचा परिणाम उस्मानाबाद, उमरगा, अंबाजोगाई आदी दूरच्या मतदान केंद्रांवर कर्मचाºयांना पोहोचण्यास मध्यरात्रीपेक्षा अधिक कालावधी लागला. याचवेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निवडणुकीसंदर्भातील याचिकांचा निकाल मतदानाच्या दिवशीच जाहीर करण्यासाठी सुनावणी ठेवली होती. यात कोणताही निर्णय येऊ शकत होता. बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी मतदान प्रक्रियेतील सर्व अधिकारी दिवसभर खंडपीठात सुनावणीसाठी हजर होते. यामुळे गुरुवारी मतदान यंत्रणेला सर्व प्रकारच्या सूचना, प्रशिक्षण देण्यात उशीर झाला. यातच बुधवारी सायंकाळी निवडणुका पुढे ढकलल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. यामुळे अवघ्या १२ दिवसांपूर्वी निवडणूक निर्णय अधिकारीपदाचा पदभार स्वीकारलेल्या डॉ. साधना पांडे यासुद्धा निराश झाल्या होत्या. अशा सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू डॉ. चोपडे यांनी मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विद्यापीठात थांबणे आवश्यक होते.या निवडणुकीचा परिणाम विद्यापीठाच्या आगामी पाच वर्षांवर होणार आहे. असे असताना बुधवारपासून दिल्ली दौºयावर असलेले कुलगुरू गुरुवारी सायंकाळी विद्यापीठात परतणार असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र कुलगुरूंनी विद्यापीठात येण्याऐवजी मुंबईला जाणे पसंत केल्याचे समजते. मुंबईत सर्व विद्यापीठांचा विकास प्रस्ताव सादर करण्यासाठी ‘रुसा’ची बैठक बोलावण्यात आली होती.या बैठकीला राज्यातील एकाही विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित नव्हते; मात्र औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू त्याठिकाणी उपस्थित राहिल्याचे सूत्रांनी सांगितले. तुमच्याकडे मतदान असताना तुम्ही बैठकीला कसे? असा प्रश्नही एका अधिकाºयाने कुलगुरूंना विचारल्याचे समजते. याविषयी कुलगुरूंशी वारंवार संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.