शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

न्यायालयीन शुल्कवाढीच्या निषेधार्थ औरंगाबाद जिल्हा न्यायालयातील वकिलांचे एक दिवसीय काम बंद आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 19:38 IST

राज्य शासनाने नुकत्याच केलेल्या न्यायालयीन शुल्कवाढीच्या निषेधार्थ जिल्हा न्यायालयातील वकिलांनी आज न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला नाही. 

औरंगाबाद : राज्य शासनाने नुकत्याच केलेल्या न्यायालयीन शुल्कवाढीच्या निषेधार्थ जिल्हा न्यायालयातील वकिलांनी आज न्यायालयीन कामकाजात सहभाग घेतला नाही. वकील संघाने तसे प्रधान जिल्हा न्यायाधीशांना १ फेब्रुवारी रोजीच निवेदनाद्वारे कळविले होते. त्यामुळे आज सर्व न्यायाधीशांनी आजच्या प्रकरणांमध्ये पुढच्या तारखा दिल्या. 

यासंदर्भात वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. संजय भिंगारदेव यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने १६ जानेवारी २०१८ रोजी न्यायालयीन शुल्कात वाढ केली व याबाबतचा आदेश जारी केला आहे. ही शुल्कवाढ अन्यायकारक असल्यामुळे वकील संघाने याचा आज निषेध केला आहे. सोमवारी (दि.५ फेब्रुवारी) जिल्हा न्यायालयातील वकील न्यायालयीन कामकाजात सहभागी होणार नसल्याचा ठराव वकील संघाच्या कार्यकारिणीने यापुर्वीच बैठकीत मंजूर केला होता. त्यामुळे आज (सोमवारी) जिल्हा न्यायालयातील वकील न्यायालयीन कामकाजात सहभागी झाले नाही. शुल्कवाढीचा भार पक्षकार आणि वकिलांना सहन करावा लागणार आहे. यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. मात्र, पक्षकार आणि वकिलांच्या विरोधाची शासनाला जाणीव व्हावी यासाठी न्यायालयीन कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. जवळपास पाचपट केलेली शुल्कवाढ रद्द करण्याची वकिलांची मुख्य विनंती आहे.