कळमनुरी : अपंंग समावेशित शिक्षकांतर्गत विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी ‘डे केअर’ सेंटर येत्या आॅगस्ट महिन्यांपासून वसमत तालुक्यातील ५ शाळांमध्ये सुरू करण्यात येणार आहे. प्रामुख्याने त्यात ८ ते १० बालके असलेल्या जिल्ह्यात २३ शाळांचा समावेश आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारानुसार विशेष गरजा असणाऱ्या बालकांना वयाच्या १८ वर्षापर्यंत सुयोग्य व संचारमुक्त वातावरणात शिक्षण देण्याची गरज आहे. तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्राथमिक शिक्षण देणे बंधनकारक आहे. त्यामुळे पालकांच्या अतिनिष्काळजीमुळे अद्याप शाळेत दाखल न झालेली बालके आता शाळेत दाखल झाली आहेत; परंतु पाठ्यपुस्तकातील पाठांमधील शब्दांच्या संकल्पना समजण्यास अडथळा येणारी बालके, अपंगत्वाच्या तीव्रतेमुळे घरीच असलेली बालके, विखुरलेली बालके व एकाच गावात एकापेक्षा अधिक असलेल्या बालकांना आता ‘डे केअर’ सेंटरमध्ये टाकण्यात येणार आहे. या केंद्रात बालकांना स्वलंबन कौशल्य, शाळापूर्व कौशल्य, सामान्य मुलांमध्ये प्राथमिक शिक्षण देखील दिले जाणार आहे. कळमनुरी तालुक्यातील उर्ध्व पैनगंगानगर कळमनुरी, चिचोर्डी, वरुड, घोडा, वारंगा फाटा या पाच शाळेत एक आॅगस्टपासून ‘डे केअर’ केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. अपंगांमध्ये मतिमंद असणाऱ्या बालकांसाठी हे विशष केंद्र राहणार आहे. या बालकांना शाळेत आणण्यासाठी मदतनिसाची देखील नेमणूक केली जाणार आहे. मदतनिसला प्रवास भत्ता व दैनिक भत्ता वर्षाला २ हजार ५०० रुपये दिला जाणार आहे. शिवाय ८ ते १० एका बालके असलेल्या शाळेत हे केंद्र सुरू केले जाणार आहेत. त्यानुरूप जिल्ह्यात २३ ‘डे केअर’सेंटर तर तालुक्यात ५ केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे बालकांना शिक्षणाचे धडे तसेच स्वावलंबन कौशल्य आत्मसात होणार आहे. कळमनुरी तालुक्यात मोबाईल शिक्षक नरसिंग मोरे, व्ही. आर. वनंजे, एस.एन. तोटावार, व्ही.पी.पांचाळे, एस.एन. वानखेडे हे वर्ग घेणार आहेत. (वार्ताहर)कळमनुरी तालुक्यातील चिचोर्डी, वरुड, घोडा, उर्ध्वपैनगंगानगर कळमनुरी, वारंगा फाटा या पाच शाळेत एक आॅगस्टपासून सुरू करण्यात येणार ‘डे केअर’ केंद्र. बालकांना नियमित शाळेत आणण्यासाठी मदतनिसाची देखील केली जाणार नेमणूक.
२३ शाळांमध्ये ‘डे केअर’ सेंटर
By admin | Updated: July 24, 2014 00:29 IST