शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुनेसह पुतण्याने केला ‘त्या’ वृद्ध दाम्पत्याचा घात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2017 00:57 IST

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथे वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेगळी दिशा मिळाली असून, सुनेनेच चुलत दिराच्या मदतीने वृद्ध सासू सासऱ्याचा घात केल्याचे तपासात पुढे आले आहे.

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथे वृद्ध दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासाला वेगळी दिशा मिळाली असून, सुनेनेच चुलत दिराच्या मदतीने वृद्ध सासू सासऱ्याचा घात केल्याचे तपासात पुढे आले आहे. पोलिसांनी दोघांनाही गुरूवारी रात्री ताब्यात घेतले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी वाळके यांनी लोकमतशी बोलताना दिली. मंठा तालुक्यातील तळणी येथे २९ जानेवारी रोजी नामदेव हनवते (७६) आणि जनाबाई नामदेव हनवते (६८) यांचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला होता शवविच्छेदन अहवालात दोघांही मारहाण झाल्याचे नमूद होते. तसेच त्यानंतर त्यांचे मृतदेह विहिरीत फेकल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच मुलगा ज्ञानदेव हनवते याने शेतीच्या वादातून आपल्या आई वडीलांचा खून झाल्याचे सांगून गावातील चार जणांवर संशय व्यक्त केला होता. त्यावरून मंठा पोलिसांनी संशयित म्हणून चौघांवर खून व अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा बुधवारी दाखल केला होता. दरम्यान, या घटनेचा तपास करताना सून अलका हनवते व मयतांचा पुतण्या पंढरी हनवते या दोघांनीच हे कृत्य केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी दोघांनाही गुरूवारी रात्री ताब्यात घेतले.दरम्यान, या खूनामागचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही. त्यांच्या चौकशीतूनच कारण पुढे येण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)