शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

गडावर पुन्हा राजकीय दरीचे ‘दर्शन’

By admin | Updated: March 21, 2016 00:22 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड शिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांच्या पुढाकारातून रविवारी नारायणगडावर आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित राहिले.

व्यंकटेश वैष्णव , बीडशिवसंग्रामचे संस्थापक आ. विनायक मेटे यांच्या पुढाकारातून रविवारी नारायणगडावर आयोजित कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुपस्थित राहिले. पाठोपाठ भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देखील पाठ फिरवली. त्यामुळे उपस्थितांना राजकीय दरीचे दर्शन झाले.आ. मेटे व पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय मतभेदाची चर्चा नेहमीच होते त्याला वारंवार पुष्टी मिळू लागली आहे. पालकमंत्री मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे या दोघींचीही कार्यक्रमास अनुपस्थिती होती. शिक्षणमंत्री विनोद तावडे हे ही गैरहजर राहिले. महत्त्वाचे म्हणजे भाजपचा एकही आमदार कार्यक्रमाकडे फिरकला नाही. गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी पत्रिकेत नाव नसताना ऐनवेळी हजेरी लावली; परंतु त्यांच्या दिमतीला भाजपचा एकही कार्यकर्ता दिसून आला नाही. एरव्ही भाजपचा कुठलाही नेता जिल्ह्यात आला तर कार्यकर्ते, पदाधिकारी त्यांच्या भोवती गराडा घालतात. पण पत्रिकेत नाव असताना भाजप पदाधिकारी कार्यक्रमापासून अलिप्त राहिले. याचीच चर्चा कार्यक्रमस्थळी होती.मेटेंना आवरला नाही मोह !गडावरून राजकीय समीकरणे जुळविण्याचा अनुभव जिल्ह्याला नवा नाही. मेटे यांनी देखील नारायणगडावर आयोजित कार्यक्रम हा राजकीय नसल्याचे भाषणाच्या सुरूवातीला केले. मात्र, राजकीय टिप्पणी करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. कोणाला भगवानगडावरून तर कोणाला गोपीनाथगडावरून दिल्ली, मुंबई दिसते असा टोला लगावत, भगवानगडाचा आशीर्वाद घेऊन अनेकजण आमदार, खासदार झाले. मात्र, त्याच्या जोडीला नारायणगडाचाही आशीर्वाद होता, अशी आठवण त्यांनी करून दिली.नगदनारायणाची सेवा करणाऱ्यांना ‘नगद’ प्रसाद मिळतो. मात्र, गडाजवळ राहणाऱ्यांना विसर पडल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या भाषणात केला.