शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या खाबूगिरीने अंधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:21 IST

प्रत्येक रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे, बेशिस्त वाहतूक आणि त्यात भरीस भर म्हणून महापालिका पथदिवे बंद ठेवते...! शहरातील ५० हजारांपैकी जवळपास २० हजार पथदिवे आजही बंद पडलेले आहेत.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील शंभर स्मार्ट शहरांमध्ये मराठवाड्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक औरंगाबाद शहराला तब्बल दीड वर्षापूर्वी स्थान मिळाले. स्मार्ट सिटीतील मूलभूत सोयी-सुविधा बघितल्या तर अत्यंत दळभद्री स्वरूपाच्या आहेत. प्रत्येक रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे, बेशिस्त वाहतूक आणि त्यात भरीस भर म्हणून महापालिका पथदिवे बंद ठेवते...! शहरातील ५० हजारांपैकी जवळपास २० हजार पथदिवे आजही बंद पडलेले आहेत.पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीवर दर महिन्याला दीड कोटी रुपये (वीज बिल वगळून) खर्च करते. पाण्यासारखा पैसा खर्च करूनही शहरातील प्रमुख रस्त्यांवर रात्री अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. महापालिकेतील शिवसेना-भाजप युतीसह विरोधी पक्ष असलेल्या एमआयएमकडूनही पथदिव्यांच्या कंत्राटदारांना राजकीय आश्रय मिळत आहे.शहरातील कोणत्या प्रमुख रस्त्यांवर सायंकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत सर्वाधिक वर्दळ असते. याचा अभ्यास करून महापालिकेने पथदिव्यांची व्यवस्था करायला हवी. पथदिवे लावणे हे मनपाचे कर्तव्य आहे, म्हणून रस्त्यांवर नुसते विजेचे खांब उभे करण्यात आले आहेत. त्यात दिवा आहेत किंवा नाहीत याची साधी दखलही महापालिका घेत नाही. महापालिकेत लाइनमनची संख्या खूप कमी आहे, असे निमित्त करून ८ वर्षांपूर्वी पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे खाजगीकरण करण्यात आले. खाजगीकरणात सेनेने अधिक पुढाकार घेतला होता. खाजगीकरण करताच सेनेच्या काही नगरसेवकांनी नातेवाईकांच्या नावावर देखभाल-दुरुस्तीची कामे घेतली. कंत्राटदारांना सकाळी दिवे बंद करणे आणि सायंकाळी चालू करणे एवढेच काम आहे. पाच पैसेही खर्च न करता दरमहिन्याला २२ ते २५ लाख रुपये मिळू लागले. त्यामुळे इतर राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनीही या कंत्राटी पद्धतीत उडी घेतली. प्रमुख राजकीय पक्षांचे नगरसेवक सध्या पथदिव्यांसाठी नेमलेल्या २२ कंत्राटदारांचे गुरूच बनले आहेत.दिवे असून नसल्यासारखेजालना रोडवर सर्वाधिक वर्दळ असते. या रस्त्यावर काही पथदिवे सुरूही असतात. मात्र, एखादा पादचारी रस्ता ओलांडत असेल तर दुचाकी आणि चारचाकी वाहनधारकाला तो अजिबात दिसत नाही. एवढा अंधूक प्रकाश या दिव्यांचा असतो. कंत्राटदारांनी लावलेल्या दिव्यांचा प्रकाश किती पडतो याची साधी खातरजामही कोणी करू नये का...? एवढे अडाणी आपले अधिकारी आहेत का...? अधिकारी दर महिन्याला कंत्राटदारांची बिले चुपचाप कशी तयार करून देतात...? विना अडथळा या कंत्राटदारांना बिले मिळतात कशी...?