शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीतच काळोख

By admin | Updated: August 9, 2014 00:24 IST

जालना : जुना व नवीन जालन्यातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने थकबाकीचेनिमित्त दाखवून पुन्हा खंडित केल्यामुळे श्रावण महिन्यात

जालना : जुना व नवीन जालन्यातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने थकबाकीचेनिमित्त दाखवून पुन्हा खंडित केल्यामुळे श्रावण महिन्यात सणासुदीच्या काळातच संपूर्ण शहर पुन्हा काळोखात बुडाले आहे.उद्योग नगरी म्हणून ओळखले जाणारे हे शहर काही महिन्यांपूर्वीपर्यंत एक ते दीड वर्ष काळोखात होते. पालिका प्रशासनाने अथक प्रयत्न करुन सुद्धा महावितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत केलाच नाही. थकित रक्कम भरा तरच वीजपुरवठा करु अशी भूमिका घेतली. अखेर पालिकाविरुद्ध महावितरणच्या शीतयुद्धाने संघर्षाचे स्वरुप घेतल्यानंतर अभय योजनेतून पालिकेस सवलत बहाल करण्यात आली. त्यातून सात कोटीपैकी १ कोटी ८० लाखांचा पहिला हप्ता पालिकेने मार्च - एप्रिल महिन्यात अदा केला. तेव्हा पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत झाला. आता पुढील हप्त्याचा प्रश्न उभा राहिला आहे. ती देयके द्यावीत कोठून असा सवाल पालिकेने केल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पथदिव्यांचा वीजपुरवठा पुन्हा खंडित केला. पाठोपाठ पाणीपुरवठा योजनेचाही पुरवठा खंडित केला. त्यामुळे आता नव्याने प्रश्न उभे राहिले आहेत.पावसाळ्याच्या महिन्यातच जालनावासियांना तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार असे चित्र आहे. त्यातच बंद पथदिव्यांमुळे अनेक प्रश्न उद्भवले आहेत. शहरातील रस्ते, चिखलमय झाले आहेत. झोपटपट्ट्यांमधून व नवीन वसाहतींमधून रस्त्यावरुन ये- जा करणे जिकिरीचे बनले आहे. त्यातच आता बंद पथदिव्यांमुळे या रस्त्यावरुन रात्री बेरात्री ये- जा कशी करावी अशी चिंता नागरिकांना लागली आहे. सायंकाळी सात नंतरच रस्ते सामसूम होऊ लागले आहेत. जुना व नवीन जालन्यातील या परिस्थितीमुळे नागरिक हादरुण गेले आहेत. (प्रतिनिधी)श्रावण मास सुरु आहे, म्हणजेच सणासुदीच्या या महिन्यात प्रत्येक कुटुंंबियांत रेलचेल आहे. रक्षाबंधन पाठोपाठ, कृष्णजयंती, पतेती, गणशोत्सव, महालक्ष्मी तोंडावरच आहे. या काळात जुना व नवीन जालन्यातील पथदिवे बंद असणे परवाडणारे नाही. अधीच शहरात छोट्या मोठ्या भुरट्या चोऱ्यांना उधाण आले आहे. त्यातच पावसाळा लांबला आहे. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने अडेलतट्टूपणाची भूमिका घेऊ नये असा सूर आहे.जायकवाडी - जालना योजनेतून शहरापर्यंत पोहचणारे पाणी जलशुद्धीकरण केंद्रापासून टाक्यांपर्यंत पोहचविण्यासाठी वीजपंपांना वीजपुरवठा गरजेचा असताना महावितरणने त्या पंपांचाही पुरवठा खंडित करीत पालिकेस कोंडीत पकडले. आता पालिकेने धावाधाव सुरु केली. काही रक्कम अदा करुन पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परंतु बंद पथदिव्यांचा प्रश्न कायम राहील, अशी चिन्हे आहेत. पालिकेने दुसरा हप्ता भरावयास असमर्थता दाखविली आहे.