शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीतच काळोख

By admin | Updated: August 9, 2014 00:24 IST

सणासुदीच्या काळातच संपूर्ण शहर पुन्हा काळोखात बुडाले आहे.

जालना : जुना व नवीन जालन्यातील पथदिव्यांचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने थकबाकीचेनिमित्त दाखवून पुन्हा खंडित केल्यामुळे श्रावण महिन्यात सणासुदीच्या काळातच संपूर्ण शहर पुन्हा काळोखात बुडाले आहे.उद्योग नगरी म्हणून ओळखले जाणारे हे शहर काही महिन्यांपूर्वीपर्यंत एक ते दीड वर्ष काळोखात होते. पालिका प्रशासनाने अथक प्रयत्न करुन सुद्धा महावितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत केलाच नाही. थकित रक्कम भरा तरच वीजपुरवठा करु अशी भूमिका घेतली. अखेर पालिकाविरुद्ध महावितरणच्या शीतयुद्धाने संघर्षाचे स्वरुप घेतल्यानंतर अभय योजनेतून पालिकेस सवलत बहाल करण्यात आली. त्यातून सात कोटीपैकी १ कोटी ८० लाखांचा पहिला हप्ता पालिकेने मार्च - एप्रिल महिन्यात अदा केला. तेव्हा पथदिव्यांचा वीजपुरवठा सुरळीत झाला. आता पुढील हप्त्याचा प्रश्न उभा राहिला आहे. ती देयके द्यावीत कोठून असा सवाल पालिकेने केल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पथदिव्यांचा वीजपुरवठा पुन्हा खंडित केला. पाठोपाठ पाणीपुरवठा योजनेचाही पुरवठा खंडित केला. त्यामुळे आता नव्याने प्रश्न उभे राहिले आहेत.पावसाळ्याच्या महिन्यातच जालनावासियांना तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार असे चित्र आहे. त्यातच बंद पथदिव्यांमुळे अनेक प्रश्न उद्भवले आहेत. शहरातील रस्ते, चिखलमय झाले आहेत. झोपटपट्ट्यांमधून व नवीन वसाहतींमधून रस्त्यावरुन ये- जा करणे जिकिरीचे बनले आहे. त्यातच आता बंद पथदिव्यांमुळे या रस्त्यावरुन रात्री बेरात्री ये- जा कशी करावी अशी चिंता नागरिकांना लागली आहे. सायंकाळी सात नंतरच रस्ते सामसूम होऊ लागले आहेत. जुना व नवीन जालन्यातील या परिस्थितीमुळे नागरिक हादरुण गेले आहेत. (प्रतिनिधी)पथदिवे सुरु करण्याची मागणीश्रावण मास सुरु आहे, म्हणजेच सणासुदीच्या या महिन्यात प्रत्येक कुटुंंबियांत रेलचेल आहे. रक्षाबंधन पाठोपाठ, कृष्णजयंती, पतेती, गणशोत्सव, महालक्ष्मी तोंडावरच आहे. या काळात जुना व नवीन जालन्यातील पथदिवे बंद असणे परवाडणारे नाही. अधीच शहरात छोट्या मोठ्या भुरट्या चोऱ्यांना उधाण आले आहे. त्यातच पावसाळा लांबला आहे. या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने अडेलतट्टूपणाची भूमिका घेऊ नये असा सूर आहे.जायकवाडी - जालना योजनेतून शहरापर्यंत पोहचणारे पाणी जलशुद्धीकरण केंद्रापासून टाक्यांपर्यंत पोहचविण्यासाठी वीजपंपांना वीजपुरवठा गरजेचा असताना महावितरणने त्या पंपांचाही पुरवठा खंडित करीत पालिकेस कोंडीत पकडले. आता पालिकेने धावाधाव सुरु केली. काही रक्कम अदा करुन पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परंतु बंद पथदिव्यांचा प्रश्न कायम राहील, अशी चिन्हे आहेत. पालिकेने दुसरा हप्ता भरावयास असमर्थता दाखविली आहे.