शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या दारी प्रशासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 00:55 IST

नांदेड : जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या घरी भेट देवून प्रशासनाने कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेतल्या. जिल्ह्यात २०१२ ते आॅक्टोबर अखेरपर्यंत ज्या शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत त्या शेतकºयांच्या कुटुंबियांची एकाच दिवशी भेटी घेवून त्यांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेण्यात आला. आढाव्यानंतर आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना शासनाकडून मदत केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

ठळक मुद्दे६९५ जणांच्या घरी जावून जाणून घेतल्या व्यथा : मोहिमेसाठी ३९१ अधिकारी-कर्मचाºयांची केली होती नियुक्ती

निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मोठ्या प्रमाणात शेतकºयांना बसला आहे. सातत्याने पडणाºया दुष्काळामुळे शेतीच्या उत्पन्नातील अनियमितता व त्यामुळे झालेल्या कर्जबाजारीपणामुळे शेतकºयांनी टोकाचा मार्ग स्वीकारत आत्महत्येला जवळ केले आहे. नांदेड जिल्ह्यातही २०१२ ते ३१ आॅक्टोबर २०१७ पर्यंत तब्बल ६९५ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. यातील ४७४ शेतकºयांना शासनाची मदत मिळाली आहे तर २१३ प्रकरणांमध्ये शासनाची मदत मिळू शकली नाही. जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या किनवट तालुक्यात आहेत.१३६ शेतकºयांनी येथे आत्महत्या केल्या आहेत. त्या खालोखाल हदगाव तालुक्यात ८५, कंधार- ६८, हिमायतनगर-५४, लोहा-५०, भोकर-४२, माहूर-४१, मुखेड-३८, बिलोली-३६, नायगाव-३०, नांदेड-२७, उमरी-२५, अर्धापूर-१९, मुदखेड-१९, धर्माबाद-१४ आणि देगलूर तालुक्यात ११ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर कुटुंबामध्ये कधीही भरुन न येणारी पोकळी निर्माण होते. मयत शेतकºयांचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते. आत्महत्याग्रस्त शेतकºयांना शासनाच्या किती योजनांचा लाभ मिळाला आहे, याचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यात १५ नोव्हेंबर रोजी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांच्या संपूर्ण परिस्थितीची माहिती घेण्यात आली. त्या कुटुंबांची काय परिस्थिती आहे, किती कुटुंब स्वबळावर उभी राहिली याची पाहणी करताना आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी प्रशासन त्यांच्या दारापर्यंत बुधवारी पोहोचले होते. या भेटीत घेतलेल्या माहितीतून भविष्यात काही उपाययोजना करण्याचेही प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यातील ६९५ आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या घरी भेटी देण्यासाठी ३९१ अधिकारी-कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामध्ये ७८ नोडल आॅफिसरचाही समावेश होता. या मोहिमेत जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, कृषी अधीक्षक, उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर शासकीय विभागातील अधिकाºयांनीदेखील शेतकरी कुटुंबियास भेट देवून अडचणी जाणून घेणे आवश्यक होते. प्रशासनाकडून बुधवारी आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांकडून शासनाची मदत मिळाली काय? आत्महत्या केलेल्या शेतकºयांची परिस्थिती, आत्महत्येचे कारण, कुटुंबियांची माहिती, शेतीची एकूण माहिती, कर्जविषयक माहिती, उत्पन्नाचे स्त्रोत आदी २२ मुद्यांची माहिती एकत्रित केली आहे.