शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

शहरात धोकादायक जलकुंभ; काहींची दुरावस्था

By admin | Updated: May 13, 2015 00:25 IST

संजय कुलकर्णी , जालना सुमारे तीन लाख लोकसंख्येच्या जालना शहरात पाण्याची साठवण करणारे अकरा जलकुंभ आहेत. मात्र यातील नगरपालिकेच्या जुन्या इमारतीमधील

संजय कुलकर्णी , जालनासुमारे तीन लाख लोकसंख्येच्या जालना शहरात पाण्याची साठवण करणारे अकरा जलकुंभ आहेत. मात्र यातील नगरपालिकेच्या जुन्या इमारतीमधील जलकुंभ अत्यंत जीर्ण झाल्याने तो धोकादायक आहे. तर मुख्य जलशुद्धीकरण केंद्रातील तिन्ही जलकुंभांची दुरावस्था झालेली आहे. त्यामुळे महिनोमहिने या जलकुंभांची स्वच्छताच होत नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.शहरात नवीन भागासाठी घाणेवाडी जलाशय तर जुना जालन्यासाठी जायकवाडी योजनेद्वारे पाणीपुरवठा होतो. गेल्या चार दिवसांपासून घाणेवाडी जलाशयाच्या जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम सुरू असल्याने तेथून पाणी घेणे बंद आहे. शहरवासियांना दररोज ४८ एमएलडी पाण्याची गरज आहे. मात्र साठवण क्षमता कमी असल्याने दररोज ६ ते ७ एमएलडी एवढेच पाणी या जलकुंभांमध्ये साठवले जाते. त्यामुळे शहरात सहा-सात दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मुख्य जलशुद्धीकरण केंद्र हे निजामकालीन आहे. १९६४ मध्ये या केंद्रात साडेनऊ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ तयार करण्यात आला. त्यानंतर १९८४ मध्ये याच क्षमतेचा तर २००३-०४ मध्ये २२ लाख लिटर क्षमतेचा जलकुंभ तयार करण्यात आला. या तीन जलकुंभांमध्ये नवीन जालन्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याची साठवण केली जाते. ५० वर्षे जुन्या झालेल्या जलकुंभाच्या पायऱ्यांभोवती नेहमी आग्यामोहोळ असते. यापूर्वी आग्यामोहळाने काही पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांवर तर एका अभियंत्यावरही हल्ला करून त्यांना जखमी केलेले आहे. त्यामुळे या पायऱ्यांजवळ कोणी जात नाही. शुद्धीकरण केंद्रातील उर्वरीत दोन जलकुंभांमध्ये कर्मचाऱ्यांना आतमध्ये उतरण्यास पायऱ्याच नाहीत, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. कारण या लोखंडी पायऱ्यांना उतरती कळा आलेली असल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत.या जलकुंभांमध्ये वर्षानुवर्षे स्वच्छता केली जात नाही. अग्निशामक दलाच्या पंपाद्वारे आत पाणी सोडून स्वच्छता केली जाते, असा दावा तेथील कर्मचाऱ्यांकडून केला जातो. परंतु या जलकुंभांची दुरावस्था लक्षात घेता त्यांची साफसफाई अनेक दिवसांपासून झालेली नसावी, असे दिसून येते. जालना जिल्हा निर्मितीपूर्वीचा जलकुंभ येथे आहे. परंतु त्याची दुरावस्था झाल्याने या जलकुंभावर जाणे म्हणजे जोखीम घेण्यासारखे आहे. नगरपालिकेने या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.