शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पॉलिटेक्निक संस्थाकडून धोक्याची घंटा

By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST

श्रीनिवास भोसले, नांदेड पॉलिटेक्निकला प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कीटचा पासवर्ड कोणत्याही संस्थेला अथवा व्यक्तीला देवू नये

श्रीनिवास भोसले, नांदेडपॉलिटेक्निकला प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या कीटचा पासवर्ड कोणत्याही संस्थेला अथवा व्यक्तीला देवू नये, असे केल्यास आॅप्शन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांसोबत धोका होवू शकतो़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉलेज निवडताना स्वत: लक्ष देवून पसंती क्रमांक द्यावेत़ मराठवाड्यात जवळपास ६१ संस्थांमध्ये पॉलिटेक्निक कॉलेज आहेत़ यातील बऱ्याच संस्थांमध्ये विद्यार्थी प्रवेश घेत नसल्याने जागा रिक्त राहतात, अशा संस्था विविध शक्कल लढवून प्रवेश वळविण्याच्या प्रयत्नात आहेत़ गत दोन दिवसांपासून पॉलिटेक्निक प्रवेश अर्ज कीटची विक्री आणि नोंदणी सुरू झाली आहे़ दोन दिवसांमध्ये शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे ११०० कीटची विक्री झाली आहे़ दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेशपूर्व नोंदणी करणे, आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया आदीविषयी फारशी माहिती नसते़ याचाच फायदा घेण्याच्या प्रयत्नात काही संस्था आहेत़ अनेक खाजगी संस्थांमध्ये पॉलिटेक्निकच्या विविध शाखा उपलब्ध असूनदेखील सुविधा आणि गुणवत्तेअभावी विद्यार्थी या संस्थामध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक नाहीत़ त्यामुळे अशा संस्थामध्ये अनेक जागा रिक्त राहत आहेत़ कोणत्याही परिस्थितीत आपल्या संस्थेतील प्रवेश पूर्ण करून घेण्यासाठी संस्थाचालक आणि तेथील प्राध्यापक वेगवेगळ्या शक्कल लढवत आहेत़ काही संस्थाचालकांनी नेट कॅफे चालकाशी संगणमत करून आॅप्शन फॉर्म भरताना आपल्या कॉलेजला एक क्रमांकाची पसंती देण्याचे नियोजन केले आहे़ आॅप्शन फॉर्म भरताना अशी घ्यावी काळजी़़़पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांनी आॅप्शन फॉर्म भरताना काळजीपूर्वक कॉलेज निवडावेत़ याठिकाणी कॉलेजला पसंती देताना जे कॉलेज पाहिजे त्या कॉलेजलाच क्रमांक एकची पसंती द्यावी, यानंतर अनुक्रमे कॉलेजनुसार पसंती क्रमांकाचे पर्याय भरावेत़ आॅप्शन फॉर्मवरील माहिती स्वत: काळजीपूर्वक भरावी़विद्यार्थ्यांची आर्थिक लूट पॉलिटेक्निकची आॅनलाईन प्रवेशपूर्व नोंदणीपासून ते प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आॅनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नेट कॅफेवर विद्यार्थ्यांकडून ४०० ते ६०० रूपये घेवून विद्यार्थ्यांची आर्थिक लूट केली जात आहे़ ही बाब लक्षात घेवून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ५० रूपये नाममात्र शुल्क घेवून आॅनलाईन नोंदणी करून दिली जात आहे़प्रवेश अर्जाच्या पासवर्डबाबत गोपनियता ठेवा़़़पॉलिटेक्निक प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना कीट घेतल्यानंतर आॅनलाईन नोंदणी करावी लागते़ यानंतर अर्ज व कागदपत्रांची छाननी होते़ आक्षेप नोंदविणे व दुरूस्त करणे़ तद्नंतर गुणवत्तेनुसार प्रवेशपात्र विद्यार्थ्यांना आॅनलाईन त्यांच्या लॉगीनमधून कोणते कॉलेज हवे यासंदर्भात पर्याय द्यावे लागतात़ अशावेळी पासवर्ड दुसऱ्या व्यक्तीला अथवा संस्थेला माहिती असेल तर समोरील व्यक्ती त्यास पाहिजे त्या संस्थेचे नाव क्रमांक एकवर टाकेल़ जेणेकरून त्या संस्थेचे प्रवेश अधिक होतील़ काही संस्था विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया मोफत करून देण्याचे आमिष दाखवून त्यांचे पासवर्ड आपल्याकडे जमा करून घेत आहेत़ ज्या विद्यार्थ्यांनी पासवर्ड दिले आहेत त्यांनी पर्याय (आॅप्शन फॉर्म) भरताना स्वत: उपस्थित राहून आपल्याला पाहिजे त्या कॉलेजला अनुक्रमे पसंती क्रमांक द्यावेत़ जेणेकरून त्या विद्यार्थ्यांस पाहिजे ते कॉलेज मिळण्यास मदत होईल़ शासकीय तंत्रनिकेतनमध्ये आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया समिती शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्राचार्य एस़ एम़ खासीम यांच्या मार्गदर्शनाखाली आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया समिती नियुक्त करण्यात आली़ यामध्ये अध्यक्ष प्रा़डॉ़ जी़ एम़ डक , उपाध्यक्ष प्रा़डॉ़एस़व्ही़बेट्टीगिरी, ए़ आऱ शकुर, प्रा़ एस़ आऱ मुधोळकर, व्ही़ व्ही़ कुलकर्णी, एस़ पी़ राठोड, श्रीमती एस़ जी़ दुटाळ, के़ एस़ कळसकर, श्रीमती डॉ़एम़ व्ही़ यादव, श्रीमती डॉ़ ए़ ए़ जोशी, व्ही़ के़ फुलवळकर, शेख अफसर, जी़ एम़ नंदे, एस़ बी़ चव्हाण, आऱ एस़ मध्यैबैलवाड, डी़ एम़ शिरवंदे यांचा समावेश आहे़