शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

विद्युत तारांचा रहिवाशांना धोका

By admin | Updated: August 7, 2014 23:33 IST

बीड : शहरातील अनेक भागात विद्युत तारा लोंबकळल्याने त्या घराच्या छताजवळ आल्या आहेत.

बीड : शहरातील अनेक भागात विद्युत तारा लोंबकळल्याने त्या घराच्या छताजवळ आल्या आहेत. काही तारा तर चक्क छताला चिटकल्या आहेत. यामुळे अनुचित प्रकार घडण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. बीड शहरतील नवनाथ नगर, हनुमान नगर, मोंढा परिसर, तेलगाव नाका, बार्शी नाका, रविवार पेठ, शनि मंदिर गल्ली यासह इतर भागात विद्युत व्यवस्थेसाठी विद्युत खांब बसविण्यात आले आहेत. यातून विद्युत ग्राहकांना विद्युत जोडणी दिलेली आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी विद्युत तारा लोंबकळल्या आहेत. काही ठिकाणी तर तारा छताच्या अगदीच जवळ आल्या आहेत. अनेक नागरिकांचे दोन ते तीन मजली घर आहे. अशा घराजवळून विद्युत तारा अगदीच चिकटून गेल्याने या तारा घराच्या गॅलरीमधून हाताचा स्पर्श होईल, अशा अंतरावर आहेत. यामुळे लहान मुलांचा खेळताना विद्युत तारांना स्पर्श होईल, याची भितीही नागरिकांमध्ये असते. अनेकदा महिलांना छतावर धुणे किंवा इतर वस्तू वाळविण्यासाठी ठेवाव्या लागतात. अशावेळी महिलांचा तारांना स्पर्श होऊ शकतो, याचा धोकाही आहे. अनेक नागरिकांनी घरावरील तारा हटविण्यात मागणी केली आहे. मात्र, याकडे महावितरण दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे. तसेच काही नागरिकांच्या छतावरून तारा आडव्या गेल्या आहेत. यामुळे नागरिकांना दुसरा मजला बांधण्यासही अडचणी येत आहेत. शहरातील काही भागातून रस्ता ओलांडूनही तारा गेल्या आहेत. अशा काही ठिंकाणच्या तारा अत्यंत सैल झाल्या असल्यामुळे त्या खाली आल्या आहेत. अनेकदा जड वाहने किंवा माल असलेली वाहने रस्ता ओलांडताना त्यांचा विद्युत तारांना स्पर्श होता. अनेकदा तारांमध्ये ठिणग्याही उडतात. यामुळे मोठी दुर्घटना होण्याची भीतीही नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. शहरात घडल्या दुर्घटनाशहरातील अनेक भागातील विद्युत तारा सैल झाल्या आहेत. यामुळे शहरातील अनेक ठिकाणी विद्युत तारांचा स्पर्श होऊन विजेचा धक्का लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. (प्रतिनिधी)तारांचा धक्का लागण्याच्या घडल्या घटना धोका होण्यापूर्वी दुरस्ती करावीशहरातील हनुमान नगर, नवनाथ नगर आदीसह इतर ठिकाणी नागरिकांच्या घरावर विद्युत तारा आलेल्या आहेत. नागरिकांना बांधकाम करण्यातही अडचणी येत आहेत. याप्रकारामुळे काही दुर्घटना होऊ नये, यासाठी महावितरणने संबंधित ठिंकाणच्या विद्युत तारा दुरुस्त कराव्यात अशी मागणी अंगद मुळे, अशोक डोईफोडे आदींनी केली आहे.उपाययोजना सुरू आहेत- केंद्रेशहरातील अनेक ठिंकाणच्या विद्युत तारा नागरिकांच्या छताजवळ आल्या आहेत तसेच तारा सैलही झाल्याने दुर्घटना होत आहेत, या बाबत महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एम. एच. केंद्रे म्हणाले की, शहरातील अनेक ठिकाणच्या तारा दुरुस्त केल्या आहेत. तसेच शंभरपेक्षा अधिक ठिकाणी रोहित्र बसविण्यात आले आहेत. काही अनुचित घटना घडू नये यासाठी काळजी घेतली जात आहे.