हिंगोली : जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदार यादी अंतिम करण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांत लावून दावे व हरकती नोंदविण्यास सांगितले होते. मात्र नगर पंचायतींवरून मार्गदर्शन मागविल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब होत आहे.जि.प., नगरपालिका व नगर पंचायतींमधून जिल्हा नियोजन समितीवर सदस्य पाठवायचे आहेत. लोकसंख्येच्या निकषानुसार ही सदस्यसंख्या येणार आहे. मात्र त्यातही प्रशासनाला काही बाबी स्पष्ट होत नसल्याने मार्गदर्शक सूचना मागविल्या आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला नाही. साधारणपणे आॅगस्टमध्ये ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र त्याच्या मार्गदर्शक सूचना येत्या दोन दिवसांत आल्यास ही प्रक्रिया गतिमान होईल. अन्यथा तोपर्यंत प्रतीक्षेशिवाय पर्याय दिसत नाही. जिल्हा परिषदेत अनेकांना विषय समिती निवडीत चांगल्या समितीवर जाण्यापासून वंचित ठेवल्याने आता त्यांना जिल्हा नियोजन समितीचे वेध लागले आहेत. या समितीसाठी आश्वासन मिळालेली मंडळी आता ही निवडणूक कधी लागणार आहे, याची विचारणा करताना दिसत आहे.
डीपीसीच्या निवडणुकीचे घोडे मार्गदर्शनात अडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 23:35 IST
जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मतदार यादी अंतिम करण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांत लावून दावे व हरकती नोंदविण्यास सांगितले होते. मात्र नगर पंचायतींवरून मार्गदर्शन मागविल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास विलंब होत आहे.
डीपीसीच्या निवडणुकीचे घोडे मार्गदर्शनात अडले
ठळक मुद्दे निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास विलंबमार्गदर्शक सूचना येत्या दोन दिवसांत