चौकट :
जोडीदारावरचा ताण वाढला
कोरोना वाॅर्डात काम करत असल्याने साहजिकच आमच्याविषयी अनेकांच्या मनात भीती असते. त्यामुळे आमच्यापैकी अनेकजणींच्या घरी घरकामाला येण्यास मोलकरीण तयार होत नाहीत. सध्या तर अशी परिस्थिती आहे, की आम्ही सतत आमच्या कामात आहोत, घरी गेल्यावरही घरच्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही त्यांच्यापासून वेगळे राहतो. त्यामुळे कुटुंबातील बहुतांश जबाबदाऱ्या आमच्या जोडीदाराला सांभाळाव्या लागत आहेत. यातून अनेकदा ताण-तणाव आणि कौटुंबिक कलहाचे प्रसंग येतात, पण शेवटी कर्तव्य मोठे असल्याने आमचे कुटुंबही नमते घेते आणि आम्हाला साथ देते, अशा भावना काही परिचारिकांनी व्यक्त केल्या.
चौकट :
कोरोनामुळे डॉक्टरांसह आम्ही सर्वच आरोग्य कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहोत. याचा परिणाम साहजिकच आमच्या कुटुंबावरही होत आहे. कर्मचाऱ्यांपैकी ज्या महिला आहेत आणि ज्यांच्या घरी लहान मुले, वृद्ध व्यक्ती आहेत, त्यांच्यावरची जबाबदारी तर आणखीच जास्त आहे. स्वत:ला सुरक्षित ठेवणे, कुटुंबाची सुरक्षितता जपणे आणि रुग्णांच्या तब्येतीकडेही लक्ष देणे, अशा तिन्ही आघाड्यांवर आरोग्य कर्मचाऱ्यांचा लढा सुरू आहे.
- कुसुम भालेराव
अधिपरिचारिका