जालना : वृद्ध सासू सासऱ्याचा खून केल्याची कबुली सून अलका हनवते आणि दीर पंढरी हनवते यांनी मंठा पोलिसांनी दिल्याने त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दोघांना मंठा पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नामदेव हनवते (७६) आणि जनाबाई नामदेव हनवते (६८) यांचा मृतदेह २९ जानेवारी रोजी शेतातील विहिरीत आढळून आला होता. त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणी गावातील तीन संशयितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांच्या डोक्याला जबर मार लागल्याने वृध्द दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले होते. या प्रकारात घरातील व्यक्तीचा समावेश असण्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली होती. त्यानुसार पोलिसांनी सर्व संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी केली. यात अलका हनवते (२४) आणि पंढरी हनवते (१९) यांच्या जबाबात पोलिसांना संशय आल्याने दोघांच्या हालचालीवर पोलिसांनी गेली काही दिवस गुप्त पाळत ठेवली होती. या खून प्रकरणात दोघांचा समावेश असल्याचे पोलिसांना समजताच पोलिसांनी अलका आणि विठ्ठलला गुरूवारी ताब्यात घेतले होते.विशेष म्हणजे दोघेही पळून जाण्याच्या तयारीत होते. पोलिसी खाक्या दाखवताच वृध्द दाम्पत्याचा खून केल्याची कबुली दोघांनी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. (प्रतिनिधी)
अनैतिक संबंधातूनच झाली दाम्पत्याची हत्या...
By admin | Updated: February 4, 2017 00:50 IST