शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

हाता-पायाच्या नसा कापून मित्राचा केला निर्घृण खून

By admin | Updated: May 7, 2016 00:06 IST

औरंगाबाद : मित्राला बहिणीच्या घरी नेऊन त्याचे दोरीने हात-पाय बांधले. तीक्ष्ण हत्याराने त्याच्या हाता-पायाच्या नसा कापल्या, तसेच गळ्यावर आणि पोटावर वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला.

औरंगाबाद : मित्राला बहिणीच्या घरी नेऊन त्याचे दोरीने हात-पाय बांधले. तीक्ष्ण हत्याराने त्याच्या हाता-पायाच्या नसा कापल्या, तसेच गळ्यावर आणि पोटावर वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी जयभीमनगरमध्ये दुपारी १२ ते २ वाजेच्या सुमारास घडली. शुभम अनिल वाघुले (२२, रा. लहुजीनगर, हर्सूल) असे मयताचे नाव आहे. विशेष म्हणजे नसा कापल्यावर संशयित आरोपीने शुभमला खोलीत कोंडून घेतले आणि पोबारा केला. याप्रकरणी शुभमचे वडील अनिल वाघुले यांच्या फिर्यादीवरून सुशील दाभाडे (रा. सिद्धार्थनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.याबाबत बेगमपुरा पोलिसांनी सांगितले की, मयत शुभम आणि संशयित आरोपी सुशील दाभाडे हे दोघे अकरावीपासून मित्र आहेत. सध्या ते शासकीय महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत आहेत. काही दिवसांपूर्वीच शुभम एका कंपनीत नोकरीला लागला होता. बुधवारी रात्रपाळीची ड्यूटी करून गुरुवारी सकाळी तो घरी आला होता. सकाळी १० वाजेच्या सुमारास त्याचा मित्र सुशील दाभाडे घरी आला. त्यानंतर शुभम आईला सांगून सुशीलसोबत घराबाहेर पडला. हे दोघे जयभीमनगरमध्ये सुशीलच्या बहिणीच्या घरी गेले. सुशीलची बहीण आणि भावजी दोघेही बाहेर गेलेले असल्यामुळे ते दोघे घरीच थांबले. याच खोलीत शुभमचे हात-पाय बांधून त्याच्या नसा कापण्यात आल्या. गळ्यावर, पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले, तसेच गुप्तांगही कापण्यात आले. हे अमानुष कृत्य करून आरोपींनी घराला बाहेरून कुलूप लावले आणि पोबारा केला.सुशील दाभाडे आणि शुभम यांनी तीन दिवसांपूर्वी सोबत ‘सैराट’ सिनेमा पाहिल्याचे घाटीत जमा झालेल्या नातेवाईकांनी सांगितले. उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी शुभमचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा निश्चय केला होता. पोलीस निरीक्षक शेख सलीम यांनी नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर मृतदेहाची उत्तरीय तपासणी सुरू झाली. आरोपीच्या शोधार्थ पाच पथकेशेजाऱ्यांनी कुलूप तोडले तेव्हा शुभम खोलीत मदतीसाठी याचना करीत होता. सुशीलला विचारा, त्याने मला का मारले, असे तो पुटपुटत होता, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे बेगमपुरा पोलिसांनी सुशीलच्या कुटुंबियांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच फरार असलेल्या सुशीलचा शोध घेण्यासाठी पाच पथके पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक शेख सलीम यांनी दिली.