शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
3
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
4
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
5
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
6
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
7
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
8
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
9
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
10
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
11
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
12
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
13
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
14
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
15
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
17
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
18
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
19
रिअलमीचा धमाका! ७०००mAh बॅटरीसह Realme Narzo 90 सिरीज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
20
हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित...
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या कारभाराने ग्राहक वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 21:53 IST

तक्रारींचे निवारण केले जात नसून महावितरणचे अधिकारी टोलवा-टोलवी करीत असल्याचा आरोप वीज ग्राहकांनी केला आहे.

वाळूज महानगर : वाळूजमध्येमहावितरणकडून वीजग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले पाठविण्यात आली आहेत. यासंदर्भातील तक्रारींचे निवारण केले जात नसून महावितरणचे अधिकारी टोलवा-टोलवी करीत असल्याचा आरोप वीज ग्राहकांनी केला आहे. महावितरणच्या सावळ्या गोंधळामुळे वीज ग्राहकांत असंतोषाचे वातावरण आहे.

महावितरणच्या गलथान कारभारामुळे वीज ग्राहक कंटाळले आहेत. गावातील अनेकांना मीटर रिडींगप्रमाणे देयके न देता अंदाजे बिले दिली जात आहेत. वीज बिल न भरल्यास महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वीज पुरवठा खंडीत करण्याच्या धमक्या देत असल्याने ग्राहकात असंतोषाचे वातावरण पसरले आहे. गावातील अनेक ग्राहकांचे वीज मिटर तपासणीसाठी महावितरणचे कर्मचारी घेऊन गेले आहेत. मात्र, तीन-तीन महिने या मीटरची तपासणी केली जात नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे नवीन वीज जोडणीसाठी अनामत रक्कम भरुनही मीटर देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची ओरड ग्राहकांतून होत आहे. ग्राहकांना घरपोच देयके न देता अन्यत्र ठेवली जात असल्याने ग्राहकांना ती मिळत नाहीत. त्यामुळे ती वेळेत भरली जात नाहीत. विलंबाने बिले भरल्यास ग्राहकांना विनाकारण दंडाचा भुर्दंड सोसावा लागत आहे. विशेष म्हणजे भरमसाठी वीज देयके, मीटर तपासणी, नवीन मीटर जोडणी आदी संदर्भात महावितरण कार्यालयात तक्रारी करुनही याचे निवारण करण्यास महावितरणचे अधिकारी टोलवा-टोलवी करीत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. वरिष्ठ अधिकारीही स्थानिक कर्मचाऱ्यांची पाठराखण करीत असल्यामुळे ग्राहक संतप्त झाले आहे. विजयनगर या वसाहतीत कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने विद्युत मोटारी जळण्याचे प्रकारही वाढले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामारे जावे लागत असल्याचे गावातील विठ्ठल त्रिभुवन, सुरेश जाधव, बिस्समिल्लाबी शेख, विमलबाई खंडागळे आदींनी सांगितले.

आंदोलनाचा इशारामहावितरणच्या गलथान कारभारामुळे ग्राहक त्रस्त झाले असून तक्रारीचे निवारणही होत नसल्यामुळे ग्राहकात असंतोष धुमसत आहेत. विजयनगरात ३ फेजची व्यवस्था करुन विज पुरवठा सुरळीत करावा, ग्राहकांची होणारी लूट थांबविण्यात यावी, अन्यथा ८ एप्रिल रोजी महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा रतन अंबिलवादे, रज्जाक शेख, विठ्ठल त्रिभुवन, सुलेमान शेख, बशीर पठाण, मिना पारखे, सुजाता बागुल, सावित्रीबाई त्रिभुवन,छाया त्रिभुवन, शोभा जाधव, समिना पठाण, परवीन शेख, आशा सोनवणे, शिल्पा जाधव, सुरेखा वंजारे, जया थोरात, जयश्री थोरात, राधाबाई पोपळघट, सोनाली हिवाळे आदींनी दिला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणWalujवाळूज