या आदेशात खालीलप्रमाणे अंशत: बदत करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे कळविण्यात आले आहे. ३० एप्रिलपर्यंत रात्री ८ ते सकाळी ७ या काळात संचारबंदी, मनाई आदेश लागू राहील. तसेच प्रत्येक शनिवार व रविवार संपूर्ण मनाई लॉकडाऊन असेल.
कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण, सेवा वगळता रात्री ८ ते सकाळी ७ या वेळात संचार करण्यास प्रतिबंध असेल. मात्र, यामधून जीवनावश्यक वस्तूंचा (दूध, भाजीपाला,फळे इ.) पुरवठा करणारे, वृत्तपत्र सेवा व अत्यावश्यक सेवा पुरविणारे आस्थापना व व्यक्तींना, कोविड लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या वाहनांना वगळण्यात येत आहे. तसेच ज्या उद्योगाचे शिफ्टमध्ये कामकाज चालते, अशा संबंधित आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना व त्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांना या आदेशामधून वगळण्यात येत आहे. घाऊक भाजीपाला व फळविक्रेते यांच्यासाठी महापालिका क्षेत्रातील ९ झोनमधील ४१ ठिकाणी विक्री स्पॉट, वाॅर्ड ऑफिसर यांच्या निगराणीखाली निश्चित करण्यात आले आहेत. स्विमिंग पूल, स्पा, व्यायामशाळा (जिम), हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रुम, बार, फुड कोर्ट, मॉल, नाश्ता सेंटर इ. आस्थापना बंद राहतील. तथापि हॉटेल, रेस्टॉरंट, नाश्ता सेंटर इ. यांच्यामार्फत पार्सल सेवा, घरपोच सेवा रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहील. रस्त्यांवरील खाद्यपदार्थांचे स्टॉल (टपऱ्या) येथे अन्नपदार्थांचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील. केवळ पार्सल घेऊन जाण्यास परवानगी राहील. ज्यूस सेंटर व रसवंतीगृहे बंद राहतील. फक्त पार्सल घेऊन जाण्यास परवानगी राहील. आठवडे बाजार संपूर्ण बंद राहतील. कोचिंग क्लासेस संपूर्ण बंद राहतील. नियोजित बैठका ऑनलाईन माध्यमातून घेता येतील, असे आदेशात म्हटले आहे.