शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशिक्षण दौऱ्यावरुन पालिकेत कोलाहल

By admin | Updated: June 29, 2014 00:37 IST

लातूर : आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या वतीने लातूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांना मनपा प्रशासन, नागरी सेवा-सुविधांचे व्यवस्थापन यासह अन्य विषयांवर दोन दिवस प्रशिक्षण देणार आहे.

लातूर : आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या वतीने लातूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांना मनपा प्रशासन, नागरी सेवा-सुविधांचे व्यवस्थापन यासह अन्य विषयांवर दोन दिवस प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक नगरसेवकांना मनपाच्या नगर सचिव विभागाने पत्र दिले आहे. अभ्यासविषयक असलेल्या या प्रशिक्षणाला राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने ही राजकीय मने जुळविण्यासाठी सहल असल्याचा आरोप केला आहे. शिर्डी येथील प्रशिक्षणात नगरसेवकांना ७४ वी घटना दुरुस्ती व बारावे परिशिष्टात नमूद कामे, महानगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायती कायदा, सभा शास्त्र, नागरीकरण व शहरांना भेडसावणाऱ्या समस्या, नागरी सेवा सुविधा वितरण व नागरी सेवा स्तर मूल्यांकन, आवश्यक नागरी सेवा सुविधा- पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते व पूल बांधणी, रस्त्यावरील दिवे इत्यादी सर्व सेवांचे व्यवस्थापन याविषयींचे प्रशिक्षण तज्ज्ञांमार्फत देण्यात येणार आहे. दोन दिवसीय प्रशिक्षणातून नगरसेवकांना मनपातील कायदे व सेवाविषयक कामांची माहिती मिळणार आहे. प्रशिक्षणासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांना मनपाच्या नगर सचिव विभागाने अर्ज दिले आहेत. त्यानुसार २८ जूनपर्यंत सदरील अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. या प्रशिक्षणासाठी कितीजण इच्छुक आहेत, हे २८ रोजी समोर येणार आहे. (प्रतिनिधी)ही तर राजकीय सहल : विरोधी पक्षाचा आरोपमनपाची आर्थिक स्थिती बिकट आहे. प्रशिक्षणासाठी शिर्डी येथे ७५ नगरसेवक व पाच अधिकारी अशा ८० जणांवर लाखो रुपये खर्च केले केले जाणार आहे. तिथे जाण्यापेक्षा तज्ज्ञांना लातुरातच बोलावून प्रशिक्षण दिल्यास मनपाची आर्थिक बचत होईल. मात्र सत्ताधाऱ्यांनी आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नगरसेवकांची मने जुळविण्यासाठी प्रशिक्षणाच्या नावावर ही राजकीय सहल आयोजित केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक राहुल माकणीकर यांनी केला आहे.शिर्डी येथे आयोजित नगरसेवकांच्या प्रशिक्षणाच्या जेवणाचा व राहण्याचा खर्च राज्य शासनातर्फे करण्यात येणार आहे. लातूर महानगरपालिकेकडून केवळ वाहतुकीचा खर्च केला जाणार आहे. अद्याप अपेक्षित खर्चाचा अंदाज आलेला नाही. इच्छुकांचे अर्ज आल्यावर त्यानुसार खर्चाची तरतूद करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणावर फार मोठा खर्च येणार नाही. दोन दिवसांत खर्चाचा आकडा समोर येईल, असे मनपाचे नगर सचिव ओमप्रकाश मुतंगे यांनी सांगितले.