शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

रविवारीही उडाली झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:59 IST

कधी आॅनलाईन तर कधी आॅफलाईनच्या कारणामुळे तसेच इतर तांत्रिक अडचणीतून मार्ग निघाल्यानंतर मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पीकविमा भरण्यासाठी शेतकºयांची बँकांपुढे गर्दी झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : कधी आॅनलाईन तर कधी आॅफलाईनच्या कारणामुळे तसेच इतर तांत्रिक अडचणीतून मार्ग निघाल्यानंतर मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात पीकविमा भरण्यासाठी शेतकºयांची बँकांपुढे गर्दी झाली. रविवारी सुटीच्या दिवशी बँका सुरु ठेवण्याचे आदेश मिळाल्याने दिवसभर पीकविमा भरणा करण्यात आला.जिल्ह्यातील १८ बँकांच्या २०३ शाखांमधून पीकविमा भरण्याची प्रक्रिया किरकोळ प्रकार वगळता रविवारी सुरळीत सुरु होती. शेतकरी पहाटेपासून सायंकाळपर्यंत रांगेत उभे होते, तर नंबर लवकर यावा म्हणून महिला शेतकºयांची गर्दी ठिकठिकाणी दिसून आली. गर्दी आणि वेळ मर्यादेमुळे बँक कर्मचाºयांवर दडपण आले होते. तरीही बँकांमधील कामकाज सुरळीत राहिले.जिल्ह्यात ५९ शाखा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आहेत. या शाखांमध्ये २०० अतिरिक्त संगणक आणि मनुष्यबळ उपलब्ध करुन पीकविमा भरण्याची प्रक्रिया गतीने पार पाडण्यात येत असल्याचे अध्यक्ष आदित्य सारडा यांनी सांगितले. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसात ४० हजार अर्ज स्वीकारण्यात आले. रविवारी किमान ६० हजार अर्ज स्वीकारले जातील असे त्यांनी सांगितले. जिल्हा व पोलीस प्रशासनाने सहकार्य केल्यामुळे बँकांमधील कामकाज व्यवस्थित पार पडत असल्याचे सांगून शेतकºयांनी शांततेत पीकविमा भरणा करावा. अखेरच्या दिवसापर्यंत पीकविमा स्वीकारला जाणार असल्याचे ते म्हणाले.दरम्यान, जिल्ह्यात रविवारी १ लाखांपेक्षा अधिक शेतकºयांनी पीकविमा भरला आहे. आतापर्यंत पीकविमा भरलेल्या अर्जाचा आकडा ३ लाखांपेक्षा जास्त असल्याचे सूत्रांनी सांगितले.पीकविमा भरण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक राहिलेला असल्याने व निम्म्यावर शेतकरी अद्याप पीकविम्या भरण्याच्या प्रतीक्षेत असल्याने बँकांना कामाची गती वाढवावी लागणार आहे.