शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2017 00:13 IST

परभणी : जून महिन्यात झालेल्या पावसावर जिल्ह्यातील अडीच लाख हेक्टरवर पेरणी झाली असून त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे ही पिके आता धोक्यात आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जून महिन्यात झालेल्या पावसावर जिल्ह्यातील अडीच लाख हेक्टरवर पेरणी झाली असून त्यानंतर पावसाने दगा दिल्यामुळे ही पिके आता धोक्यात आली आहेत. आणखी आठ दिवस पिके तग धरु शकतात. त्यानंतर मात्र दुबार पेरणीचे संकट आणखीच गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील कृषी हंगाम हा शेतकऱ्यांची अर्थ वाहिनी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या हंगामावर शेतकऱ्यांची भिस्त असते. जिल्ह्यामध्ये सुमारे साडेतीन लाख शेतकरी असून या सर्व शेतकरी कुटुंबियांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून आहे. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याची भाकिते वेधशाळेने वर्तविली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या. पेरणीसाठी जोरदार तयारी सुरु करण्यात आली. विशेष म्हणजे, पावसाळा सुरु होण्याच्या तोंडावरच ६ आणि ७ जून रोजी जिल्ह्यात जोरदार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे यावर्षी पाऊस चांगला आहे, असे गृहित धरुन अनेक शेतकऱ्यांनी या पहिल्याच पावसावर पेरणी करण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पेरण्याही सुरु झाल्या. काही शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या उरकून घेतल्या आहेत. जून महिन्यात झालेल्या या पहिल्या दमदार पावसानंतर अधुन-मधून पावसाचा शिडकावा झाला. परंतु, पिकांना पोषक पाऊस झाला नाही. १५ दिवसांपासून तर हा पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे पिके धोक्यात सापडली आहेत. यावर्षी जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कापसाच्या लागवडीला प्राधान्य दिले आहे. कापसापाठोपाठ सोयाबीन, तूर आणि मुगाची पेरणीही झाली आहे. परंतु, पाऊस हुलकावणी देत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढू लागल्या आहेत. मागील १५ दिवसांपासून पाऊस चक्क गायबच झाला आहे. सध्या पिके अंकुरलेल्या अवस्थेत असून, पिकांच्या वाढीसाठी मूबलक पावसाची गरज आहे. परंतु, पाऊसच होत नसल्याने ही पिके वाढण्या ऐवजी रोगाचा बळी ठरत आहेत. जिल्ह्यात पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या ही पिके तग धरुन आहेत. ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, असे शेतकरी पिकांना पाणी देऊन जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. येत्या आठ- दहा दिवसांत दमदार पावसाचे पुनरागमन झाले नाही तर दुबार पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यावर ओढवू शकते.