शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

चलन तुटवड्यामुळे पीक विमा अधांतरी

By admin | Updated: May 8, 2017 23:29 IST

बीड : जिल्ह्यात निर्माण झालेल्या चलन तुटवड्यामुळे ऐन लग्नसराईत शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी मंजूर झालेले पैसे मिळणे मुश्किल बनले आहेत

संजय तिपाले ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात निर्माण झालेल्या चलन तुटवड्यामुळे ऐन लग्नसराईत शेतकऱ्यांना पीक विम्यापोटी मंजूर झालेले पैसे मिळणे मुश्किल बनले आहेत. सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांचे वाटप रखडले आहेत. परिणामी जिल्हा बँकेचे व्यवहार ठप्प असून, मागणी व पुरवठ्यातील तफावतीमुळे अधिकारी हवालदिल झाले आहेत.२०१५ मधील कापूस अनुदानापोटी जिल्ह्याला २३८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. रबी २०१५ वर्षातील पीक विम्याचे २१६ कोटी व २०१६ मधील खरीप पीक विम्याचे ९८ कोटी आले आहेत. शासनाकडून मंजूर झालेल्या पीक विमा रकमेचे जिल्हा बँकेकडून वाटप होते. जिल्हा बँकेच्या एकूण ५९ शाखा आहेत. त्यापैकी २ शाखांचे कार्यक्षेत्र शहरी आहे. त्यामुळे ५७ शाखांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कामच उरले नाही. जिल्हा बँकेने अग्रणी बँकेकडे मागणी करूनही आवश्यक त्या रकमेचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे विमा रकमेचे वाटप रखडले आहे.ऐन लग्नसराईत पीक विमा रक्कम मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. मात्र, पैसे पदरात पडण्यासाठी त्यांना जिल्हा बँकेत खेटे मारावे लागत आहेत. बँक अधिकाऱ्यांकडून पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर वादही होत आहेत. लग्नसराई, बांधकाम व शेतीकामासाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे. मात्र, अशा अडचणीच्या वेळीच बँकेत खडखडाट आहे. उसनवारीसाठीही अनेकानी हात आखडता घेतल्यामुळे अडचणीत भर पडली आहे. शेतकऱ्यांसमोरील संकटांची मालिका काही थांबत नसल्याचे दिसून येत आहे.