शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

पैठणची मगर निघाली विदर्भाकडे; शुक्रवारी रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:32 IST

जायकवाडीच्या पायथ्याशी पकडलेली मगर वन्यजीव विभागाकडे सुपूर्द केल्यानंतर औरंगाबाद विभागाला नागपूरच्या वरिष्ठांकडून मिळालेल्या परवानगीनंतर मगरीला शुक्रवारी रात्री सुरक्षितपणे पिंज-यात टाकून वाहनातून विदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्पाकडे रवाना करण्यात आले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बुधवारी रात्री जायकवाडीच्या पायथ्याशी पकडलेली मगर वन्यजीव विभागाकडे सुपूर्द केल्यानंतर औरंगाबाद विभागाला नागपूरच्या वरिष्ठांकडून मिळालेल्या परवानगीनंतर मगरीला शुक्रवारी रात्री सुरक्षितपणे पिंज-यात टाकून वाहनातून विदर्भातील पेंच व्याघ्र प्रकल्पाकडे रवाना करण्यात आले आहे. तोतला डोहात तिला सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाने सांगितले.बुधवारी रात्री साडेदहा वाजता जायकवाडीच्या पायथ्याशी कावसान गावाच्या रस्त्यावरून ही मगर जाताना काही दुचाकीस्वारांना दिसली. पैठण येथील सर्पमित्र दिलीप सोनटक्के व राजू गायकवाड यांनी साहेबा ढवळे, राजू करवंदे, शरद शिंदे, जितेंद्र अटक, स्वप्नील साळवे, गणेश पातकळ, विष्णू जगताप, आशिष मापारी, आतिष गायकवाड, जालिंदर अडसूळ यांच्या मदतीने ८ फूट लांबीची व दीडफूट रुंद मगर जेरबंद करून ती रात्रीच पैठण येथील वन विभागाच्या हवाली केली होती.मगरीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याने ती समुद्रात किंवा अन्य ठिकाणी सोडावी, असे पत्र वन विभागाला जायकवाडी प्रशासनाने दिले होते. त्यामुळे मगर सुरक्षित व निसर्गाच्या सान्निध्यात सोडण्याचा प्रश्न वन विभागाला पडला होता.या मगरीविषयी सीसीएफ महाजन यांनी नागपूरच्या वरिष्ठांकडे विचारणा केली होती, त्यानुसार रीतसर परवानगीचे पत्र वन विभागाला प्राप्त झाल्यावर शुक्रवारी ही मगर पेंच येथील व्याघ्र प्रकल्पाकडे रवाना करण्यात आली.