शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

फक्त सल्ल्यासाठी कोटींची उधळपट्टी

By admin | Updated: July 14, 2015 00:31 IST

औरंगाबाद : समांतर जलवाहिनी योजनेंतर्गत प्रकल्प सल्लागार म्हणून एका त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली असून, तिला आतापर्यंत तब्बल २ कोटी ६० लाख रुपये अदा करण्यात

औरंगाबाद : समांतर जलवाहिनी योजनेंतर्गत प्रकल्प सल्लागार म्हणून एका त्रयस्थ संस्थेची नियुक्ती करण्यात आलेली असून, तिला आतापर्यंत तब्बल २ कोटी ६० लाख रुपये अदा करण्यात आल्याची माहिती सोमवारच्या विशेष सर्वसाधारण सभेत समोर आली. मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठ्यावरील चर्चेदरम्यान प्रकल्प सल्लागार संस्थेचा मुद्दा उपस्थित झाला. समांतर योजनेचा करार औरंगाबाद मनपा आणि वॉटर युटिलिटी कंपनीत झाला आहे; पण त्यासोबतच प्रकल्प सल्लागार म्हणून युनिटी कन्सल्टन्सी, पुणे नावाच्या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. ती कशासाठी असा सवाल राजू वैद्य यांनी उपस्थित केला. त्यावर कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी जलवाहिनीच्या कामावर देखरेख आणि तांत्रिक सल्ला देण्यासाठी म्हणून ही संस्था नेमण्यात आल्याचा खुलासा केला. तसेच तिला फीसच्या स्वरूपात प्रकल्प खर्चाच्या २.३५ टक्के इतकी रक्कम दिली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. तेव्हा काही नगरसेवकांनी आतापर्यंत या संस्थेला किती रक्कम दिली, अशी विचारणा करण्यात आली. त्याच्या उत्तरात कोल्हे यांनी सांगितले की, आतापर्यंत या संस्थेला २ कोटी ६० लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. मात्र, करारानुसार निम्मी रक्कम कंपनी आणि निम्मी रक्कम मनपा देते, त्यामुळे मनपाच्या तिजोरीतून १ कोटी ३० लाख रुपये देण्यात आले आहेत, अशी माहिती दिली. ही माहिती समोर आल्यानंतर महापौर त्र्यंबक तुपे यांनी कंपनीने आतापर्यंत काय काम केले याचे आॅडिट करून त्याची प्रत सादर करावी, तसेच आॅडिट होईपर्यंत कंपनीचे यापुढील देयक थांबवावे, असे आदेश दिले. सदोष माईक सिस्टीमवरून आज मनपाच्या विशेष सभेत गदारोळ झाला. नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर अखेर आयुक्तांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली. सभेच्या सुरुवातीपासूनच अनेक टेबलवरील माईक बंद होते. त्यामुळे नगरसेवकांना बोलता येत नव्हते. ४विशेष म्हणजे मागील सर्वसाधारण सभेतही माईकचा मुद्दा उपस्थित झाला, तेव्हा महापौरांनी ही यंत्रणा दुरुस्त करण्याचे आदेश दिले होते. संतापलेल्या काही नगरसेवकांनी हा आमचा आवाज दाबण्याचा डाव असल्याचा आरोप केला. तर काही जणांनी महापौरांचे आदेश प्रशासन ऐकत नसल्याचे मत मांडले. ४ यानंतर मनपा आयुक्त महाजन यांनी माईक दुरुस्त न झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि २० जुलैपर्यंत ही यंत्रणा दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले. माईक बंद असल्यामुळे सभेदरम्यान एकदा २० मिनिटांसाठी सभाही तहकूब करण्यात आली.