शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2016 00:42 IST

औरंगाबाद : शासनाने दहा वर्षांपूर्वी बिल्डरांसाठी सेल्फ डेव्हलपमेंटची योजना आणली होती. या योजनेचा लाभ औरंगाबाद शहरात अनेक बिल्डरांनी घेतला.

औरंगाबाद : शासनाने दहा वर्षांपूर्वी बिल्डरांसाठी सेल्फ डेव्हलपमेंटची योजना आणली होती. या योजनेचा लाभ औरंगाबाद शहरात अनेक बिल्डरांनी घेतला. बिल्डरांनी सेल्फ डेव्हलमेंटमध्ये सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही मूलभूत सोयी-सुविधा दिलेल्या नाहीत. बिल्डरांकडून ज्या नागरिकांनी घरे खरेदी केली आहेत, त्यांना सोयी देण्याचे काम मनपाला करावे लागणार आहे. सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांसह मनपातील दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आश्वासन मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले.बीड बायपास येथील समृद्धी पार्क एका बिल्डरने सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये दहा वर्षांपूर्वी उभारले. हा प्रकल्प उभारताना बिल्डरने रस्ते, पाणी, ड्रेनेज, पथदिवे आदी सर्व सोयी सुविधा देण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. नागरिकांनीही बिल्डरवर विश्वास ठेवून लाखो रुपयांना घरे खरेदी केली. मात्र, मागील काही वर्षांपासून बिल्डर कोणत्याही सुविधा देण्यास तयार नाही. समृद्धी पार्कमधील नागरिकांची अक्षरश: फसवणूक झाली आहे. माणुसकीच्या नात्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांना मनपाने सोयी सुविधा द्याव्यात, समृद्धी पार्क मनपाकडे हस्तांतरित करून घ्यावा, असा अशासकीय प्रस्ताव या भागातील नगरसेविकेने आज सर्वसाधारण सभेत ठेवला. या प्रस्तावावर राजू वैद्य, अफसर खान, माधुरी अदवंत, स्मिता घोगरे आदींनी सहभाग घेतला. बिल्डरने मनपाकडून बेटरमेंट चार्जेसमध्ये सवलत घेतली असेल. हा निधी वळवून नागरिकांना सोयी सुविधा देता येऊ शकतात असे वैद्य यांनी नमूद केले. इतर काही नगरसेवकांनी बिल्डरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. बांधकाम परवानगी देताना कोणत्या अटी व शर्थी टाकण्यात आल्या होत्या, हे तपासण्यात येईल. मनपातील अधिकारी व बिल्डर दोषी असल्यास त्वरित फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.