शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारीने डोके वर काढले

By admin | Updated: May 29, 2014 00:41 IST

जालना : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली.

जालना : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून खून, हाणामारी, चोर्‍या, लूटमार, बलात्कार, विनयभंग, जातीय तणाव यासारख्या घटना दररोज होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नानेगाव (ता. बदनापूर) येथील सरपंचाचा खुनाच्या घटनेने राज्यभर खळबळ उडाली. त्यापाठोपाठ वालसावंगीतील अल्पवयीन मुलींची हत्या, परतूर तालुक्यातील बाबूलतारा येथील ग्रामस्थांवरील अन्याय, घनसावंगीतील कंडारी काकडी येथील ध्वजप्रकरण तसेच जाफराबाद तालुक्यातील वरूड येथील जातीय तणाव प्रकरण इत्यादी घटनांमुळे जिल्ह्यात असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. जालना शहरातील साळी गल्लीतील खून प्रकरण, शनिमंदिर चौकात भरदिवसा कोयता हातात घेऊन युवकाने दहशत निर्माण केलेला प्रयत्न, याच परिसरात २७ रोजी रात्री चार जणांनी हातात तलवारी घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शहरात सकलेचानगर भागात एका व्यापार्‍याची दीड लाखांची बॅग लंपास, इन्कमटॅक्स कॉलनीत भरदिवसा झालेली सव्वा लाखांची चोरी, जुना जालना आनंदवाडी परिसरातील चोरी तसेच काही व्यापार्‍यांची दुकाने फोडण्याचे प्रकार यासारख्या घटनांमुळे सर्वसामान्य व व्यापार्‍यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. विशेषत: महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे चित्र आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग ह्या रजेवर आहेत. पोलिस यंत्रणेचा वचक न राहिल्याने अशा घटना वाढत असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी) काद्राबाद भाजीमंडई भागातील एक महिला किराणा दुकान चालवते. या महिलेला दोन मुली आहेत. एका मुलीवर प्रेम जडल्याची सांगत थेट घरात प्रवेश करणार्‍या आरोपीविरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवर काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे या महिलेने महापरिक्षेत्र पोलिस अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली. त्यामुळे १५ दिवसानंतर पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला. महिलांच्या सुरक्षेसाठी शासनाकडून कडक धोरण अवलंबविण्यात आले. मात्र पोलिस यंत्रणेत त्याची अंमलबजावी होत नाही, हे जालन्यातील उदाहरणारून स्पष्ट होते. वालसावंगी प्रकरणात तपासात गती भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे दोन चिमुकल्या मुलींचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात जिल्हा पोलिस यंत्रणेसह औरंगाबाद परिक्षेत्रातील यंत्रणेनेही तपासाची चक्रे फिरवून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यश मिळविले.सदरील घटनेनंतर पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांचा मोठा फौजफाटा दोन दिवस गावातच तळ ठोकून होता.