शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरील मैत्रिणीला पळवून नेणारा निघाला अट्टल गुन्हेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:36 IST

फेसबुक मैत्रिणाला लग्नाच्या आमिषाने महिनाभरापूर्वी पळवून नेणारा तिचा मित्र पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : फेसबुक मैत्रिणाला लग्नाच्या आमिषाने महिनाभरापूर्वी पळवून नेणारा तिचा मित्र पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध बुलडाणा जिल्ह्यातील विविध ठाण्यांत ९ गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्याला सुरत येथून पकडून आणले.सत्यपाल भीमराव वाकोडे (२५, रा. चिखली, बुलढाणा) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या वडिलांनी त्याच्याविरुद्ध मुकुंदवाडी ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मुकुंदवाडी परिसरातील रहिवासी महाविद्यालयीन मुलीची आणि सत्यपालची फेसबुकवर ओळख झाली होती. सुरुवातीला फेसबुकवर चॅटिंग केल्यानंतर त्यांच्यात मोबाइल नंबरची देवाणघेवाण झाली. व्हॉटस्अ‍ॅप या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सत्यपालने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला भेटण्यासाठी तो बुलडाणा जिल्ह्यातून औरंगाबादला यायचा. १७ सप्टेंबर रोजी कॉलेजला जाऊन येते असे सांगून घराबाहेर पडलेल्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यासह पलायन केले. काही दिवस पुणे, बुलढाणा आणि अन्य विविध शहरे बदलत तो सुरत येथे गेला. तेथील एका नातेवाईकाकडे दोघे राहू लागले. तेथे त्याने व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफीचे काम सुरू केले. तसे पाहिले तर तो बुलडाणा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार. त्याच्याविरुद्ध दंगल, मारहाणीचे आठ ते नऊ गुन्हे दाखल आहेत.पोलीस पकडतील म्हणून तो सारखा जागा बदलत होता. एवढचे नव्हे, तर मोबाइलच्या लोकेशनवरून पोलीस आपल्यापर्यंत येऊ शकतात याचा अंदाजही त्याला होता, म्हणून त्याने महिनाभरात तब्बल १२ मोबाइल सीम बदलले. प्रत्येक ठिकाणी तो वेगवेगळ्या क्रमांकाचा वापर करी, त्यामुळे त्याला शोधणे पोलिसांना आव्हान होते. सायबर क्राइम सेलने अखेर त्याने त्याच्या आईला कॉल केल्याचा माग काढला आणि तो कॉल सुरत येथून आल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सुरतला जाऊन पोलिसांच्या पथकाने सत्यपालला अटक करीत त्याच्या ताब्यातून मुलीची सुटका केली. पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे, प्रेमसागर चंद्रमोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अनिल वाघ, हेमंत तोडकर व पथकाने ही कारवाई केली.