वाळूज महानगर : महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिच्या भावाच्या तक्रारीवरून तिचा पती व प्रियकराविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. वसंत तुकाराम काळे (४५, रा. शिवराई, ता. गंगापूर) हा पत्नी धनुश्री काळे (४०) हिला तिचे तिट्या लालू काळे (रा. शिवराई) याच्याशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मारहाण करायचा. सततची मारहाण व छळाला त्रासून ८ जुलै रोजी धनुश्री काळे हिने राहत्या घरी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले होते. त्यात ती गंभीर भाजली. शासकीय रुग्णालयात तिचा ११ जुलै रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी धनुश्री हिचा भाऊ गोपाळ भोसले (रा. पिटकेश्वर, ता. इंदापूर, जि. पुणे) याने माझ्या बहिणीने पती वसंत काळे व प्रियकर तिट्या काळे यांच्या छळाला त्रासून आत्महत्या केल्याची तक्रार वाळूज पोलीस ठाण्यात दिली. वसंत काळे याला अटक झाली.
महिलेची आत्महत्या, पती व प्रियकरावर गुन्हा
By admin | Updated: July 16, 2014 01:29 IST