शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरातील भोंदू महाराजावर गुन्हा

By admin | Updated: June 13, 2014 00:35 IST

येरमाळा : मलकापूर (ताक़ळंब) येथील एकनाथ सुभाष लोमटे या भोंदू महाराजाविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

येरमाळा : अंधश्रध्देला खतपाणी घालून भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या मलकापूर (ताक़ळंब) येथील एकनाथ सुभाष लोमटे या भोंदू महाराजाविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुरूवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, जिल्ह्यात प्रथमच एका महाराजाविरूध्द जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून, यामुळे भोंदू महाराजांचे धाबे दणाणले आहेत़याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मलकापूर येथील एकनाथ महाराज लोमटे यांच्याविरूध्द १८ मार्च २०१४ रोजी भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदीप पाटील-खंडापूरकर, शिवाजी गिड्डे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती़ तक्रारीत महाराज हा कुठल्याही रोगावर खात्रीशीर उपचार म्हणून जडीबुटी, बुक्का, लिंबू-नारळ, बिबा, मिरची अशा वस्तू देऊन पैसे घेत भोंदूगिरी करून नागरिकांची आर्थिक लूट करीत असल्याचे म्हटले होते़ यानंतर जिल्हाधिकारी यांनी १८ मार्च रोजीच चौकशीसाठी एक समिती गठीत केली होती़ यावरून समिती अध्यक्षा तथा तहसीलदार वैशाली पाटील व इतर सदस्यांनी १२ जून रोजी प्रत्यक्ष मलकापूर येथे जाऊन पाहणी केली़ त्यावेळी ‘मलकापूरचा महिमा’ या पुस्तकात अंधश्रध्देला बळी पडणारे विधाने, एका जागी असताना दोन ठिकाणी असलेली विधाने, पुत्रप्राप्ती, असाध्य रोग दुरूस्त करतो, असे खोटे बोलून भाविकांची आर्थिक लूट करीत अंधश्रध्देला खतपाणी घालणारे असल्याचे समोर आले. यावरून मंडळ अधिकारी भारत एकनाथ ओव्हाळ यांनी गुरूवारी येरमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर याप्रकरणी एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांच्याविरूध्द येरमाळा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी इतर अमानुष, अनिष्ठ जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे़ दरम्यान, भ्रष्टाचार निर्मूलन समितीने अंधश्रध्देच्या विरोधात जे आंदोलन उभा केले होते़ त्यात प्रदेशाध्यक्ष प्रदीप पाटील-खंडापूरकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजी गिड्डे यांनी २३ मे रोजी कळंब तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण आंदोलन केले होते़ या आंदोलनाची गंभिर दखल घेत त्यानंतर प्रशासनाने पुढील हालचाली केल्या़ (वार्ताहर)