शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मजूर मृत्यूप्रकरणी दोघांवर गुन्हा

By admin | Updated: July 14, 2017 00:10 IST

हट्टा : तालुक्यातील करंजाळा येथील बोरींग मशीनवरील कामास असलेल्या व्यक्तीचा मृत्यू प्रकरणात गुरूवारी दोन जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला

लोकमत न्यूज नेटवर्कहट्टा : तालुक्यातील करंजाळा येथील बोरींग मशीनवरील कामास असलेल्या व्यक्तीचा मृत्यू प्रकरणात गुरूवारी दोन जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला. मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारी वरून हट्टा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वसमत तालुक्यातील करंजाळा येथील रहिवाशी मधुकर श्रावण जाधव (४०) हा व्यक्ती बोरींग मशीनवर कामास होता. निजामाबाद येथे मशीनसोबत गेला असता तो पडून जखमी झाल्याचे सांगून त्यास नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले होते. गंभीर जखमी असल्याने डॉक्टरांनी त्यास औरंगाबाद येथे हलवण्याचा सल्ला दिला होता. औरंगाबाद येथे नेम असताना वाटेतच त्याचे मंगळवारी निधन झाले.या प्रकरणी मयताची पत्नी गंगासागर जाधवने तिच्या पतीचा मृत्यू गाडीवरून पडून झाला नाही तर त्याचा पैशाच्या वादातून खून झाला असल्याची तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून हट्टा पोलिसांनी गणेश रुद्रवास (रा. पुरजळ, ह.मु. परभणी) व विश्वंभर मगर (रा. जवळाबाजार) या दोघांविरोधात कलम ३०२, ३४ भादवि अन्वये गुरूवारी सायंकाळी गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा तपास सपोनि सुनील नाईक करत आहेत. मयताचे शवविच्छेदन हट्टा, वसमत येथे न करता नांदेड येथे करण्याची मागणी मयताच्या नातेवाईकाची होती. त्यावरून बुधवारी दिवसभर हट्टा पोलीस ठाण्यात गोंधळ सुरू होता. अखेर रात्री नांदेडला शवविच्छेदन करण्यात आले होते.घटनाक्रम:- मयत इसम हा ११ रोजी निजामाबाद येथे जखमी झाला. त्यास निजामाबादहून नांदेडला आणले, नांदेडहून जखमी अवस्थेत औरंगाबादला हलवले, रस्त्यात मरण पावल्याने मयतास करंजाळा येथे आणले. तेथून हट्टा येथे मृतदेह आणला. हट्ट्यात शवविच्छेदन न केल्याने पुन्हा नांदेडला शवविच्छेदन करून पुन्हा करंजाळा येथे अंत्यसंस्कार करून १३ रोजी हट्टा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मृत्यूनंतर गुन्हा नोंदवण्यास तीन दिवस लागले हे विशेष.