अमित खंडेलवाल (रा. रेणुका सदन, बंजारा कॉलनी)असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार पीडितेचा पतीपासून घटस्फोट झाल्यापासून ती तिच्या आईवडिलांच्या घरी राहात आहे. आरोपी अमित खंडेलवाल याने सप्टेंबर २०१९ पासून ते मे २०२० या काळावधीत लग्नाचे आमिष दाखवून आणि तिच्या मुलीला सांभाळण्याचे वचन देऊन तिच्यावर अत्याचार केला. गतवर्षी मार्च महिन्यात अमितमुळे तिला गर्भधारणा झाली. हा प्रकार समजल्यावर त्याने तिला गर्भपात करण्याचे सांगितले; मात्र पीडितेने गर्भपात केला नाही. दोन महिन्यापूर्वी तिने मुलाला जन्म दिला. मात्र त्याने तिच्याशी संबंध तोडले. तो तिला भेटायलाही आला नाही. तिचे मोबाइल नंबर ब्लॅक लिस्टमध्ये त्याने टाकून दिले. यामुळे चिडलेल्या पीडितेने त्याच्याविरुद्ध शुक्रवारी पोलिसांत तक्रार नोंदविली. तपास सहायक पोलीस निरीक्षक वनिता चौधरी करत आहेत.
लग्नाच्या आमिषाने घटस्फोटित महिलेवर अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:05 IST