भूम : मागील भांडणाच्या करणावरून तलवार, जांब्या, कुऱ्हाडीने सपासप वार करीत सहा जणांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी चौघांविरूद्ध भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, चुंबळी येथील शिवशंकर उर्फ समाधान महालिंग गिराम (वय-२७) यांच्यासह प्रभुलिंग त्रिंबक गिराम, संजय प्रभुलिंग गिराम, बसवलिंग त्रिंबक गिराम, संतोष गिराम, महालिंग गिराम यांना सोमवारी रात्रीच्या सुमारास गावातीलच चौघांनी मागील भांडणाच्या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ करीत तलवार, जांब्या, कुऱ्हाडीने हातावर, पोटावर, पाटीवर, मानेवर, मनगटावर सपासप वार करीत गंभीर जखमी केले़ या प्रकरणी गंभीर जखमी असलेल्या शिवशंकर गिराम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हनुमंत मोरे, रणजित मोरे, रामचंद्र मोरे, प्रकाश लेकुरवाळे (सर्व रा़चुंबळी, ता़भूम) या चौघाविरूध्द भूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोउपनि बी़बी़वडदे हे करीत आहेत़
मारहाण प्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा
By admin | Updated: April 29, 2015 00:53 IST