शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

पाच आयोजकांसह १३ नर्तिकांवर गुन्हा

By admin | Updated: August 13, 2014 01:06 IST

पाटोदा : तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर यात्रेत नर्तिका नाचविल्या प्रकरणी पाटोदा पोलिसांनी पाच आयोजकांसह तेरा नर्तिकांवर सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला.

पाटोदा : तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर यात्रेत नर्तिका नाचविल्या प्रकरणी पाटोदा पोलिसांनी पाच आयोजकांसह तेरा नर्तिकांवर सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला. तसेच नाचगाणे बंद करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या लोकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाली लिंबा भंडारे, प्राची हरिभाऊ वाघमोडे, सुरेखा बाजीराव पवार, किरण गुलाब शिंदे, विलास बाजीराव पवार, शितल दशरथ चव्हाण, दीपा काळे, राखी चंद्रकांत पवार, रिना रमेश पवार, शुभांगी पवार, सविता पवार, निलम बापू जाधव, संगिता दत्तु काळे, गिता विजय मुसळे, रवि शिवदास शिंदे, शाहु शिवराम शिंदे, नवनाथ रावसाहेब सानप, संजिवनी रामभाऊ सानप अशी आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे, यात्रेत नर्तिका नाचविण्याच्या परवानगीसाठी पाच ते सहा आयोजक पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्याकडे महिनाभरापूर्वी आले होते. त्यावेळी अधीक्षकांनी त्यांना परवानी नाकारली होती. असा कार्यक्रम तुम्ही घ्याल तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी तंबीही त्यांना दिली होती. असे असतानाही सौताडा येथील रामेश्वर यात्रेत नर्तिका नाचविण्याचे प्रयोजन करण्यात आले. सदरील यात्रेत नर्तिका नाचविण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे़ मात्र दोन वर्षांपासून यात्रेत नर्तिका नाचविण्यावर बंदी घालण्यात आली़ गतवर्षीही नर्तिका नाचविल्या नव्हत्या़ मात्र यावर्षी यात्रेच्या महिनाभरापूर्वीच गावकऱ्यांनी नर्तिका नाचविण्यास परवानगी द्यावी, यासाठी गावकरी आग्रही होते़ प्रशासनाने फक्त बंदिस्त तंबूतील कार्यक्रमास परवानगी दिली होती मात्र येथे राजरोस उघड्यावर नर्तिका नाचवून नोटा उधळल्याचा धक्कादायक प्रकार सोमवरी समोर आला. यात्रा असल्याकारणाने सोमवारी तेथे तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.पोलीस कर्मचाऱ्यांच्या समोर नर्तिका नचविल्या गेल्या. पोलीस कर्मचाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. याची गंभीर दखल घेतली गेली अन् नर्तिकांसह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला़ (वार्ताहर)