शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
2
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
3
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
4
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
5
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
6
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
7
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
8
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
9
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
10
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प
11
'लापता लेडीज'च्या 'फूल'ची कान्समध्ये एन्ट्री, नितांशीच्या वेणीमध्ये 'या' ८ अभिनेत्रींचे फोटो
12
"मराठी मुलांनी आता उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या करायच्या का?"; शरद पवार गटाचा संतप्त सवाल
13
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
14
सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #BoycottSitaareZameenPar, नेमकं कारण काय?
15
दिलजीत दोसांझची 'नो एन्ट्री २' मधून एक्झिट! 'या' कारणामुळे दिला नकार; नेटकरी खूश
16
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
17
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून सम-विषम योजना लागू करा : वॉचडॉग फाउंडेशन
18
काश्मीरमधील दहशतवादी सैन्याच्या निशाण्यावर; जैश अन् लष्करच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान
19
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
20
"जातीनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा, कर्नाटक पॅटर्न राबवा; मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लागेल"

औरंगाबादेत हॉकर्स झोन तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:06 IST

हॉकर्स झोन स्थापन करण्यापूर्वीच महापालिकेने खाजगी कंत्राटदारांमार्फत शहरातील हॉकर्स, फेरीवाल्यांकडून दरमहा भाडे वसुलीची तयारी सुरू केली आहे. यासंबंधीचा ठराव गुरुवारच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे. या ठरावाला आज व्यापारी महासंघाने कडाडून विरोध दर्शविला. शहरातील ५० हजार हातगाडीचालकांसाठी स्वतंत्र हॉकर्स झोन स्थापन करा, या मागणीचे निवेदन महापौर नंदकुमार घोडेले यांना देण्यात आले.

ठळक मुद्देव्यापारी महासंघ आक्रमक : महापौरांना निवेदन सादर; मनपाच्या ठरावाला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हॉकर्स झोन स्थापन करण्यापूर्वीच महापालिकेने खाजगी कंत्राटदारांमार्फत शहरातील हॉकर्स, फेरीवाल्यांकडून दरमहा भाडे वसुलीची तयारी सुरू केली आहे. यासंबंधीचा ठराव गुरुवारच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आला आहे. या ठरावाला आज व्यापारी महासंघाने कडाडून विरोध दर्शविला. शहरातील ५० हजार हातगाडीचालकांसाठी स्वतंत्र हॉकर्स झोन स्थापन करा, या मागणीचे निवेदन महापौर नंदकुमार घोडेले यांना देण्यात आले.मनपा प्रशासनाने सर्वसाधारण सभेसमोर शहरातील ५० हजार हातगाड्यांना परवाने देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी बुधवारी सकाळीच व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्या नेतृत्वाखाली महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली. शहरात स्मार्ट सिटीचा प्रकल्प राबविला जात असताना शहरातील मुख्य बाजारपेठ व इतर ठिकाणी हातगाडीचालकांना परवाने देण्याचा प्रस्ताव आश्चर्यजनक आहे. व्यापाºयांना व त्या भागात राहणाºया नागरिकांना विश्वासात न घेता कोणताही ठराव महापालिकेने पारित करू नये. शहरातील हॉकर्ससंदर्भात महापालिकेने धोरण निश्चित केले पाहिजे. त्यानंतरच महापालिकेच्या सर्वोच्च सभागृहात योग्य तो ठराव पारित करण्यात यावा. शहरातील हॉकर्सबाबत महाराष्टÑ शासनाने निर्देश दिले आहेत. त्या निर्णयाप्रमाणे महानगरपालिकेत समिती गठीत केली आहे. त्यामध्ये व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी घेण्यात आले आहेत.बैठकांमध्ये हॉकर्स झोन जाहीर करून हॉकर्स परवाने देण्याचे ठरलेले आहे. हॉकर्स परवाने देत असताना त्यामध्ये हातगाड्याचालकांना सामावून घेण्याच्या निर्णयाचा समावेश करावा. शहरातील हातगाड्यांमुळे व्यापाºयांना होणाºया त्रासाबद्दल यावेळी माहिती देण्यात आली.शिष्टमंडळात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे, सरचिटणीस लक्ष्मीनारायण राठी, अजय शहा, संजय कांकरिया, दीपक पहाडे, विजय जैस्वाल, अनिल चौथर, जयंत देऊळगावकर, गुलाम हक्कानी, सुभाष दरक, कचरू वेळंजकर, आदेशपालसिंग छाबडा आदींचा समावेश होता.खुल्या जागांचा पर्यायशहरातील अनेक खुल्या जागांवर महापालिकेला हॉकर्स झोन तयार करता येऊ शकतात. शहागंज मार्केट, औरंगपुरा, जि. प. मैदान, अशा कितीतरी मोकळ्या जागा उपलब्ध आहेत. तेथे महापालिकेने हॉकर्स झोन तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा.शहरातील वाहतूकही सुरळीत राहील, व्यापाºयांनाही त्रास होणार नाही, असा पर्याय महासंघाने महापौरांसमोर ठेवला आहे. महापौरांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.