शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याची सांस्कृतिक ओळख निर्माण व्हावी

By admin | Updated: June 13, 2017 00:59 IST

जालना : साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात जालन्याची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अनुभव ट्रस्टचे डॉ. मोहन कुलकर्णी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात जालन्याची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अनुभव ट्रस्टचे डॉ. मोहन कुलकर्णी यांनी केले.पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येथील अनुभव प्रतिष्ठानतर्फे सोमवारी सायंकाळी फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित ‘पुल’ कित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर प्रसिद्ध लेखक, अभिनेता संदेश कुलकर्णी, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, अनुभव प्रतिष्ठानच्या संजीवनी तडेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलकर्णी म्हणाले, की अनुभव ट्रस्ट न्यूयार्कच्या माध्यमातून जगभरात साहित्य व सांस्कतिक चळवळीशी निगडित कार्यक्रम घेतले जातात. मराठवाड्यातील सांस्कृतिक चळवळीला बळ देण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे येथील साहित्यप्रेमींशी झालेल्या चर्चेतून जाणवले. त्यामुळेच अनुभव ट्रस्ट जालन्यात आले. जालन्यातील साहित्यप्रेमी नागरिक व प्रेक्षकांच्या काही मागण्या असतील तर त्यांनी तशा सूचना अनुभव प्रतिष्ठानच्या माध्यमातून कराव्यात. त्यानुसार बदल करत येथील सांस्कृतिक चळवळ वाढवतो येईल, असे सागंून त्यांनी मास्टर कृष्णराव फुलंंब्रीकर, केशवराव भोसले यांच्या नाट्य प्रयोगातील काही प्रसंग प्रेक्षकांना सांगितले. संजीवनी तडेगावकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची भूमिका स्पष्ट करत डॉ. मोहन कुलकर्णी व अभिनेता संदेश कुलकर्णी यांचा परिचय करून दिला.