शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सृजनात्मक साहित्य निर्मिती व्हावी

By admin | Updated: February 26, 2017 00:47 IST

जालना बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथे पाचवे शेष मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.

गंगाराम आढाव जालनामराठी साहित्य क्षेत्रातील नव कवि आणि लेखकांनी सामाजिक विषयांना भिडले पाहिजे. त्यातून अंगारयुक्त पण सृजनशील साहित्य निर्मितीसाठी सिद्ध बनले पाहिजे असे प्रतिपादन शेष मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रावसोहब ढवळे यांनी केले.बदनापूर तालुक्यातील रोषणगाव येथे जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद जालना, भाषा साहित्य,संस्कृती व संशोधन परिषद बदनापूर आणि उत्कर्ष वाङमय मंडळ बदनापूरच्या वतीने पाचवे शेष मराठी ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन नाट्यलेखक व सिने अभिनेते राजकुमार तांगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. ढवळे, आ. नारायण कुचे, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. प्रभाकर शेळके, शाहीर अण्णा गाडगे, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, पांडुरंग जऱ्हाड, जयप्रकाश चव्हाण, संजय जगदाळे उपस्थित होते.प्रा. ढवळे म्हणाले की, आजचे मराठी साहित्य सृजनात्मक कमी आणि बव्हंशी प्रतिक्रियात्मक बनले आहे. त्यामुळे साहित्य साहित्य म्हणून तरत नाही. नव्या पिढीला, वाचकांना साहित्यांचा लळा लागत नाही. साहित्य निर्मिती किंवा लेखन कला म्हणजे एक आत्मशोध असतो. त्यासाठी प्रचंड निरीक्षण आणि वाचन साधनेची गरज असते.जीवनाच्या सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार आणि दहशतवाद ही आमची जागतिक समस्या बनली आहे. अमेरिकेतल्या विद्यापीठांनी आज अन्य गोष्टींचे महत्व कमी करून साहित्य संस्कृतीच्या अध्ययनाला महत्व देत असल्याचे सांगून आपल्या देशात प्राचीन मध्ययुगीन, आधुनिक युग आणि त्याचे प्रतिनिधी एकाच घरात सुखाने नांदताना आढळतात. मात्र आता घर घर राहिले नाहीत, लॉजिग - बोर्डींग झालेले आहे हे नाकारून कसे चालणार, समाजातील दरी वाढविणारे हे दंद्व आमचे साहित्य कसे हाताळणार, हा खरा प्रश्न आणि आव्हान आहे. त्यामुळे साहित्यिकांनी अंतर्मुख होवून आधुनिक साहित्यांची वैशिष्ट्य मराठी लेखकांना पचवावी लागतील तरच आम्हाला नव्या वाटा चोखळता येतील. दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी इ. वाङ्मय प्रवाहात शेती, मातीवर अवलंबून असलेला आमचा मोठा समाज आहे. ही मोठ्या प्रमाणात साहित्य परिघाबाहेर आहे. गटशेती, बचतगट चळवळ, अ‍ॅट्रॉसिटी, माहितीचा अधिकार, महिला कायदे, सक्षमीकरण आदी सामाजिक विषय नव कवि आणि लेखकांना भिडले पाहिजे. त्यातून त्यांनी अंगारयुक्तपण सृजनशील लेखनासाठी सिद्ध बनले पाहिजे, असे आवाहन करून नवलेखकांना लिहिते होण्याची गरज प्रा. डॉ. ढवळे यांनी व्यक्त केली. यावेळी प्रख्यात नाट्य लेखक राजकुमार तांगडे यांनी आपल्या जीवनाचा प्रवास विषद करत, नवलेखकांनी कोणत्याही विषयावर लिहते झाले पाहिजे. त्यासाठी वाचन महत्त्वाचे असल्याचे सांगितले.