शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

खडीक्रशरमुळे मिरकळा, तळेवाडीतील घरांना तडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:07 IST

तालुक्यातील तळेवाडी, मिरकाळा परिसरातील खडीक्रशरमुळे नागरिकांच्या घराला तडे जात आहेत.

विष्णू गायकवाड ।लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यातील तळेवाडी, मिरकाळा परिसरातील खडीक्रशरमुळे नागरिकांच्या घराला तडे जात आहेत. तसेच धुळीमुळे नागरिकांना दमा, मुतखडा यासारखे गंभीर आजार जडले असून, आरोग्य धोक्यात आले आहे. पिकांची पत ही ढासळली असल्याने शेतक-यांना फटका बसत आहे. याठिकाणी घेण्यात येणा-या ब्लास्टींगच्या आवाजाने लहान मुलांमध्ये भितीचे वातावरण आहे. खडीक्रशर चालकाच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार करण्यास धजावत नसल्याचे बोलले जात आहे. याकडे तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.गेवराई तालुक्यातील गढी जवळील तळेवाडी, मिरकाळा येथे आठ खडीक्रशर मागील काही वषार्पासून सुरु आहेत. याठिकाणी खडीक्रशरसाठी आवश्यक असलेले गौणखणीज आहे. राष्ट्रीय महामागार्पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेवाडी दरम्यान तसेच गावाभोवती हे खडीक्रेशर आहेत. याठिकाणी ब्लास्टींगच्या घेताना मोठा आवाज होत असल्याने तळेवाडी, मिरकाळा परिसरात असलेल्या गढी, खांडवी, शिंदेवाडी, खांडवी तांडा, गढी कारखाना काँलनी आदी दहा-बारा गावांना हादरा बसून घरांना तडे तसेच छतांचे तुकडे खाली पडत आहेत. यामध्ये हनुमान यमगर, उध्दव यमगर, ख्रोबाजी यादव आदीसह अनेकांच्या घरांना तडे जावून भिंतीला भेगा पडल्या आहेत.खडीक्रशर हे गावापासून किमान चार-पाच किलोमीटर अंतरावर असणे आवश्यक आहे. मात्र हे खडीक्रशर गावालगत असल्याने ब्लास्टींग वेळेस दगडाचे तुकडे उडून गावात येत आहेत. यामुळे देखील नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच धुळीमुळे वातावरण प्रदूषित होण्याबरोबरच परिसरातील अनेक नागरिकांना नागरिकांना दमा, मुतखडा यासारखे गंभीर आजार जडले आहेत. पिकांवरही मोठ्या प्रमाणात धूळ बसून पिकांची पत ही ढासळली आहे. दिवस-रात्र केव्हाही होणाºया ब्लास्टींगच्या आवाजाने लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, खडीक्रशर चालकाची परिसरात मोठी दहशत आहे. त्यामुळे नागरिक तक्रार करण्यास धजावत नसल्याचे येथील नागरिकांमधून बोलले जात आहे. याकडे तहसील प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.