शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

फटाका मार्केट विखुरलेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:05 IST

फटाका मार्केट यंदा कुठे भरवावे यासाठी व्यापा-यांकडून जागेची चाचपणी सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मागील वर्षी ऐन दिवाळीत औरंगपु-यातील फटाका मार्केटला आग लागल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. कोट्यवधी रुपयांचे या आगीत नुकसान झाले होते. सकाळी ११ वा. ही घटना घडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही. औरंगपु-यात कोणत्याही परिस्थितीत फटाका मार्केट लागणार नाही, याची काळजी मनपाकडून घेण्यात येत आहे. फटाका मार्केट यंदा कुठे भरवावे यासाठी व्यापा-यांकडून जागेची चाचपणी सुरू आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात अनधिकृतपणे फटाक्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात येतात. या दुकानांपासूनही नागरिकांना मोठा धोका आहे.दिवाळी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असून, शहरातील फटाका विक्रेत्यांची महापालिकेकडे परवानगीसाठी धडपड सुरू झाली आहे. गरवारे क्रीडा संकुल, कर्णपुरा देवीचे मैदान आदी भागात मार्केट भरविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.कर्णपुरा देवीचे मैदान छावणी परिषदेच्या अखत्यारीत आहे. गरवारे क्रीडा संकुलावर अलीकडेच कोट्यवधी रुपये खर्च करून क्रिकेटचे मैदान उभारण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या भागात मोठी जागाच नाही.फटाका मार्केटसाठी जागा कोणती निवडावी हा सर्वात मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून फटाका मार्केट असोसिएशनचे पदाधिकारी, व्यापारी अग्निशमन कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. शहरात टी.व्ही.सेंटर, शिवाजीनगर, बीड बायपास आदी ठिकाणी मागील अनेक वर्षांपासून अनधिकृतपणे काही दुकाने थाटण्यात येतात.यातील काही दुकानांनाच परवानगी असते. मात्र, दुकानांमध्ये सुरक्षेचे कोणतेही उपाय नसतात. नागरी वसाहती जवळ असतानाही ही दुकाने अत्यंत बिनधास्तपणे थाटली जातात. महापालिकेने आजपर्यंत या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. अनधिकृत दुकानांमुळे महापालिकेला अजिबात महसूल प्राप्त होत नाही.