शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

मग्रारोहयोत सीईओंचा कारवाईचा दणका

By admin | Updated: March 15, 2016 01:01 IST

हिंगोली : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामांच्या तक्रारीचा निपटारा केला जात आहेत. तीन गावांच्या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी

हिंगोली : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामांच्या तक्रारीचा निपटारा केला जात आहेत. तीन गावांच्या प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी कारवाईचे हत्यार उपसले आहे. यात एक अभियंता, ग्रामसेवक, दोन सरपंच व ग्रामरोजगारांवर कारवाई केली असून एका प्रकरणात बीडीओपासून ग्रामरोजगार सेवकांपर्यंतच्या सर्वांना नोटिसा बजावल्या आहेत.कळमनुरी तालुक्यातील बोथी देववाडी - माळधावंडा पाणंदरस्त्याच्या कामाबाबत श्यामराव मुकाडे व इतर मजुरांनी तक्रारी केल्या होत्या. याबाबत तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशीही केली होती. सदर पाणंद रस्त्यांच्या कामास प्रशासकीय मान्यता नसतानाच ग्रा. पं. ने काम केले होते. तर मजुरांचे हजेरीपत्रक भरले असून सदर कामांचे २४ हजार ५३२ रुपये मूल्यांकन केले होते. यात संबंधित अधिकाऱ्यांना नोटिसा बजावून खुलासे मागविले होते. मात्र ते असमाधानकारक असल्याने संबंधित शाखा अभियंता ए. एन. पतंगे व तत्कालीन ग्रामसेवक जे. जी. काकडे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याच प्रकरणात ग्रामरोजगारसेवक संतोष खंदारे यास पदावरून कमी केले तर सरपंच निर्मला भुजंग डुकरे यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यास गटविकास अधिकाऱ्यांना सांगितले आहे.डिग्रसवाणीत फौजदारीहिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी येथे मग्रारोहयोच्या कामांवर मयत, अपंगांची हजेरी दाखविली होती. रमेश आढळकर यांनी केलेल्या तक्रारीनंतर चौकशीतही हा प्रकार समोर आला. त्यामुळे संबंधित सरपंच व ग्रामसेवकांकडून अपहारित रक्कम वसूल करण्यात आली आहे. यात शासनाची फसवणूक केल्याचे मात्र समोर आले. शासकीय रक्कमेचा अपहार, खोटी अभिलेखे तयार व सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी वरील दोघांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश बीडीओंना दिला. (जि.प्र.)औंढा तालुक्यातील तुर्कपिंप्री येथे नुकताच स्वच्छता विभागाने कार्यक्रम घेवून गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याचा उत्सव साजरा केला. या कार्यक्रमाला खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर आर्दड यांनी हजेरी लावली. मात्र त्यावेळी ग्रामसेवक ए.ए. जाधव तेथे हजर नसल्याचे आढळून आले. या उत्सवाच्या निमित्ताने आर्दड यांनी गावफेरी केली होती. तेव्हा विविध भागात त्यांना साफसफाई आढळून आली नाही. याबाबत त्यांनी ग्रामस्थांनाही विचारले तर काही कामेही अर्धवट असल्याचे दिसले. त्यावरून सीईओ आर्दड हे चांगलेच संतापले होते.सेनगाव तालुक्यातील लिंगदरी येथे ६ डिसेंबर २0१४ रोजी नरेगा उपायुक्तांनी भेट दिली होती. कामाबाबत नाराजी व्यक्त करून चौकशी प्रस्तावित केली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल आल्यानंतर यात आर्थिक अनियमितता आढळून आली. ४यात संबंधित अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून आर्थिक नुकसानीची वसुली करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता. यात नमुना क्र.४ प्राप्त होण्यापूर्वीच तत्कालिन गटविकास अधिकाऱ्यांनी कार्यारंभ आदेश निर्गमित केल्याचे दिसून येते. ४मागणी नसलेल्यांना काम, मजुरांच्या स्वाक्षऱ्या नसणे आदी बाबी आढळल्या. यात संबंधित तत्कालीन गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक, कंत्राटी कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याने कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.