शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या कोविड केअर सेंटरमध्ये सुविधा कमी अन् त्रास जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 19:05 IST

एप्रिलमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर जुलै ते ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या गतीने वाढत गेली.

ठळक मुद्देकोरोना चाचणी करूनही अहवाल देण्यास दिरंगाई 

बीड : येथील शासकीय आयटीआयमधील कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण व चाचणी करण्यासाठी गेलेल्या संशयितांना सुविधा कमी आणि त्रासच जास्त सहन करावा लागत आहे. एखाद्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर धक्का बसल्याने तो घाबरून जातो, असे असतानाही येथील डॉक्टर, कर्मचारी अहवाल देण्यास दिरंगाई करीत असल्याच्या तक्रारी नातेवाईकांनी केल्या आहेत. विशेष म्हणजे, येथे कसलेच नियोजन नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

एप्रिलमध्ये जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर जुलै ते ऑक्टोबरमध्ये रुग्णसंख्या गतीने वाढत गेली. त्यामुळे रुग्णालयातील खाटा संपल्या होत्या. हाच धागा पकडून लक्षणे नसणाऱ्यांसाठी शासकीय आयटीआयमध्ये कोविड केअर सेंटर सुरू केले. येथे डॉक्टर, हॉस्पिटल मॅनेजर, स्टोअर किपर, परिचारिका, कक्षसेवक असे कर्मचारी नियुक्त केले. सर्व काही असतानाही केवळ ढिसाळ नियोजनामुळे सामान्य रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना येथे त्रास सहन करावा लागत आहे.

चाचणी झाल्यानंतर बाधित रुग्णाला तत्काळ आयसोलेट करणे गरजेचे असते. अनेकांची प्रकृती चिंताजनक असते तर काहींची अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर घाबरून चिंताजनक बनते.तरीही येथील डॉक्टर, कर्मचारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. तपासणी तर दूरच  परंतु सहकार्यही करत नाहीत. तसेच रुग्णालयात दाखल होण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवालही देत नसल्याच्या तक्रारी नातेवाईकांनी केल्या आहेत. सेवा द्यायच्या सोडून मोबाईल, हेडफोनमध्ये मग्न राहणे, इतरत्र फिरणे व गप्पा मारण्यातच कर्मचारी व्यस्त असल्याचेही सांगण्यात येत आहे. अशा हलगर्जीपणा करणाऱ्या व ढिसाळ नियोजन करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.

डीडी, डीएचओ, प्रमुखांचेही कोणी ऐकेनानातेवाईकांनी येथील ढिसाळ कारभाराबद्दल उपसंचालक डॉ.एकनाथ माले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांना कल्पना दिली. तसेच सेंटरचे प्रमुख डॉ.अमित बायस यांनाही कळविले. परंतु तरीही काहीच फरक पडला नाही. यावरून येथील गलथान कारभाराचा प्रत्यय येतो. 

आयटीआयमधील सीसीसीबद्दल तक्रार आली आहे. याची चौकशी करण्यास सांगितले आहे. दोन दिवसांत अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल.- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडMedicalवैद्यकीय