शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा न्यायालयाचा आदेश

By admin | Updated: August 9, 2014 00:33 IST

अंबाजोगाई : खोटा चेक देऊन ड्रॉमध्ये लागलेली दुचाकी न दिल्यामुळे दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश अंबाजोगाई न्यायालयाने शहर ठाण्याच्या पोलिसांना दिले ओहत.

शेख इमाम शेख इनायतअली (रा. साकूड) व प्रदीप जोगदंड ( रा. मिलिंद नगर, अंबाजोगाई) असे फसवणूक करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई येथील सतीश दरवेशवार यांना शेख इमाम शेख इनायतअली व प्रदीप जोगदंड यांनी स्वत:च्या इच्छापूर्ती होम अप्लायसेंस कंपनी बाबत माहिती देऊन त्यांना कंपनीचे सभासद (क्र. ००००५७) करून घेतले होते. त्यानंतर सहाव्या हप्त्यात सतीष दरवेशवार यांना हिरो होंडा सी. डी. डिलक्स ही दुचाकी लागली होती. ती आरोपींनी मुदतीत न दिल्यामुळे दरवेशवार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यावेळी आरोपींनी शंभर रुपयांच्या स्टँपपेपरवर तडजोडपत्र लिहून दुचाकी ऐवजी ३२ हजार रुपयांचा चेक दिला होता. तो चेक वटविण्यासाठी दरवेशवार बँकेत गेले असता यावेळी आरोपीच्या खात्यात रक्कमच नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर दरवेशवार यांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली होती. यावेळी सदर प्रकरणावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे दरवेशवार यांनी न्यायालयात ४२०, ४२३, ४६५ ते ४७१, ३४ भादविनुसार फिर्याद दिली. त्यानंतर आरोपी शेख इमाम शेख इनायत अली व प्रदीप जोगदंड या दोघांवर शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्याय एस. व्ही. भुतके यांनी दिले आहेत. या प्रकरणात फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. व्ही. डी. शिंदे, अ‍ॅड. एस. एस. व्यवहारे, अ‍ॅड. पी. एम. जोगदंड, अ‍ॅड. एम. एम. कलशेट्टी, अ‍ॅड. जे. एम. पटेल यांनी काम पाहिले. (वार्ताहर)